‘मनसू मल्लिगे’ होणार फेबु्रवारीत प्रदर्शित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 02:43 IST2017-01-16T02:43:32+5:302017-01-16T02:43:32+5:30

‘सैराट’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू अलीकडे ‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती.

'Manasu Melige' will be seen in February | ‘मनसू मल्लिगे’ होणार फेबु्रवारीत प्रदर्शित

‘मनसू मल्लिगे’ होणार फेबु्रवारीत प्रदर्शित


‘सैराट’ चित्रपटातून रातोरात स्टार झालेली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू अलीकडे ‘सैराट’च्या कन्नड रिमेकच्या चित्रीकरणात व्यस्त होती. परंतु आता या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समजतेय. आता या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. त्यामुळे फेबु्रवारीत हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा निर्मात्यांचा मानस असल्याचे कळतेय. ‘मनसू मल्लिगे’ असे नाव असलेल्या या कन्नड ‘सैराट’ची बरीच चर्चा रंगली होती. एस. नारायण हे 'मनसू मल्लिगे'चे दिग्दर्शक आहेत. गेली १५ वर्षे ते कन्नड चित्रपटाचे दिग्दर्शन करीत असून, ‘सैराट’चा कन्नड रिमेक त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारला आहे. या चित्रपटाचे शूटिंग बंगळुरू, होस्पेट, गदग, कोल्लेगला, चामराजनगर येथे पार पडले. गेले ३० दिवस हे शूट सुरू होते. ‘सैराट’ चित्रपट कन्नड, तमीळ, तेलुगू आणि मल्याळम् या भाषांत बनणार आहे. याचे हक्क रॉकलाईन व्यंकटेश या दाक्षिणात्य निर्मात्याकडे आहेत. या चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर किती यश मिळते, ते लवकरच समजेल.

Web Title: 'Manasu Melige' will be seen in February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.