"नक्कीच खूष होईल माझा सर्जा...", मानसी नाईकच्या व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 10:55 AM2024-04-24T10:55:45+5:302024-04-24T10:56:41+5:30

Manasi Naik : मानसी नाईकचा सोशल मीडियावरील व्हिडीओ चर्चेत आला आहे.

Manasi Naik's video grabs everyone's attention, "Surely my Sarja will be happy..." | "नक्कीच खूष होईल माझा सर्जा...", मानसी नाईकच्या व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

"नक्कीच खूष होईल माझा सर्जा...", मानसी नाईकच्या व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सतत चर्चेत येत असते. नुकतेच तिने पुन्हा प्रेमात पडल्याचे सांगितले. त्यानंतर तिने बॉयफ्रेंडसोबतचा फोटोदेखील शेअर केला. त्यानंतर आता सोशल मीडियावरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत तिच्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मानसी नाईक हिने इंस्टाग्रामवर जांभळ्या रंगाची नेसली आहे आणि बॅकग्राउंडला तुझ्या रंगी साज रंगली हे गाणे ऐकायला मिळत आहे. तिने या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, साडी म्हणजे दर्जा… पाहून मला नक्कीच खूष होईल माझा सर्जा. मानसीच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया
मानसी नाईकच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका युजरने लिहिले की, काहीपण म्हणा मराठी मुलीचं सौंदर्य साडीतच उठून दिसतं. दुसऱ्या युजरने म्हटले की, आई गं किती ते गोड दिसावं. मनु दी गोंडस हा. याशिवाय सुंदर, खूपच गोड, सुपरक्युट अशा कमेंट केल्या आहेत.

पुन्हा प्रेमात पडल्याचा अभिनेत्रीने केला खुलासा
मानसीने अलिकडेच इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने खास व्यक्ती सोबत फोटो रिपोस्ट करत ती पुन्हा प्रेमात पडल्याचा खुलासा केला होता. तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, माझं प्रेम मी एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे. या फोटोमध्ये ते दोघे आयफेल टॉवरसमोर उभे असून त्यांनी छान सेल्फी क्लिक केला होता. मानसीच्या बॉयफ्रेंडचं नाव राहुल खिस्मतराव आहे. तो अंतराळ शास्त्रज्ञ आहे. तीदेखील जर्मनीत स्थित होणार असल्याचेही तिने मुलाखतीत सांगितले.

Web Title: Manasi Naik's video grabs everyone's attention, "Surely my Sarja will be happy..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.