पुरुषाची गरज फक्त मुलांसाठी - प्रियांका चोप्रा
By Admin | Updated: January 27, 2016 17:38 IST2016-01-27T17:38:13+5:302016-01-27T17:38:13+5:30
माझे हिरे मी स्वत: खरेदी करते असं सांगत, माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल असे सांगितले

पुरुषाची गरज फक्त मुलांसाठी - प्रियांका चोप्रा
>प्रियांका चोप्राला हिरे आवडतात, परंतु त्यासाठी तिला साथीदाराची गरज नाहीये. अत्यंत स्वाभिमानी असलेल्या या डॅडीज लिटल गर्लने फिल्मफेअर मॅगेझिनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या स्पष्टवक्तेपणाचाही प्रत्यय दिला आहे.
तिच्या बोटात असलेल्या हि-याच्या अंगठीबाबत कुतुहलानं विचारलं असता, 'माझे हिरे मी स्वत: खरेदी करते असं सांगत, माझ्या आयुष्यात पुरुष आलाच तर तो मला हिरे विकत घेऊन देण्यासाठी नसेल. ज्यावेळी मी कुणावर प्रेम करेन त्याचवेळी तो माझ्या आयुष्यात येईल आणि तो हि-यांसाठी नाही तर मुलांसाठी असेल,' असे प्रियांकाने ताडकन सुनावले.
प्रियांकाला सिंगल स्टेटस आवडतं का, असं विचारल्यावर, मला मुलं आवडतात, त्यासाठी मी नक्की लग्न करेन असं ती सांगते. विवाहबाह्य संबंधातून मुलाला जन्म देणं ठीक नसल्याचं सांगताना, समाजच तसा असल्याचं ती म्हणते.
स्वत:विषयी विचार करण्याला प्राधान्य देण्याचा आपला स्वभाव असल्याचंही प्रियांकानं म्हटलं आहे. कुठलीही रिलेशनशिप ब्रेक करणं सोपं नसतं, असं सांगताना, आपण आपल्याला कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी हव्या आहेत ते बघावं असं ती म्हणते. म्हणजे, मला पुस्तकं हवीत, मला झोप हवी, मला चांगले मित्र हवेत असं करावं आणि स्वत:ला त्या दुस-या व्यक्तिपासून वेगळं करावं, इति प्रियांका
प्रियांका चोप्राने तिच्या रिलेशनशिपबद्दल बोलण्याचं टाळताना, मला या गोष्टी बोलायला आवडत नसल्याचं म्हटलं आहे. मी रिलेशनशिपमध्ये आहे की नाही हे दुसरं कोण कसं सांगणार, ते माझंच मला माहित आहे असं सांगत तिने या विषयात रस नसल्याचं सूचित केलं.