माई पडल्या आजारी
By Admin | Updated: February 10, 2015 23:27 IST2015-02-10T23:27:49+5:302015-02-10T23:27:49+5:30
अचानक मालिकांमधून काही दिवसांसाठी बाहेर गेलेला कलावंत लवकर कधी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना असते. आदित्य मेघनाप्रमाणेच माई

माई पडल्या आजारी
अचानक मालिकांमधून काही दिवसांसाठी बाहेर गेलेला कलावंत लवकर कधी दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना असते. आदित्य मेघनाप्रमाणेच माई आणि नानांना रोज पाहायची सवय आहे. मात्र सध्या नाना-माईला गावाला गेल्याचे दाखवले आहे. प्रत्यक्षात मात्र माई म्हणजेच सुकन्या मोनेंच्या हाताला दुखापत होऊन त्या आजारी पडल्या आहेत. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. त्यामुळे काही दिवस तरी माईंचे दर्शन दुर्लभच आहे.