मेडोना स्टेजवरून पडली
By Admin | Updated: February 27, 2015 23:14 IST2015-02-27T23:14:04+5:302015-02-27T23:14:04+5:30
लंडनमध्ये एका सोहळ्यात पॉप गायिका मॅडोनाची फजिती उडाली. कार्यक्र म सुरू होताच मॅडोना अडखळून पडली. त्या वेळी उपस्थित चाहत्यांच्या

मेडोना स्टेजवरून पडली
लंडनमध्ये एका सोहळ्यात पॉप गायिका मॅडोनाची फजिती उडाली. कार्यक्र म सुरू होताच मॅडोना अडखळून पडली. त्या वेळी उपस्थित चाहत्यांच्या काळजाचा ठोका क्षणभर का होईना चुकला. मात्र काही क्षणांत तिने स्वत:ला सावरले आणि पुन्हा माहोल बेहोश करणारा परफॉर्मन्स दिला. या वेळी शाही वस्त्रासारखे मखमली कपडे तिने खांद्यावरून टाकलेले होते. ओढणीसारख्या या कपड्यांनी दगा दिल्याचे स्पष्टीकरण तिने सोशल साइट्सवर केले.