अश्विनी ये ना...! बूर्ज खलिफा समोर मराठी अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा ठसका, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 14:10 IST2025-08-13T14:09:25+5:302025-08-13T14:10:21+5:30
अभिनेत्रीनं आपल्या तुफान डान्सनं इन्स्टाग्राम दणाणून सोडलं

अश्विनी ये ना...! बूर्ज खलिफा समोर मराठी अभिनेत्रीचा अस्सल मराठमोळा ठसका, इन्स्टाग्राम दणाणून सोडलं
Madhuri Pawar Dance Video: माधुरी पवार (Madhuri Pawar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. 'देवमाणूस','रानबाजार' या कलाकृतींमुळे ती घराघरांत पोहोचली. याशिवाय माधुरी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सध्या माधुरीचा दुबईतील बूर्ज खलिफासमोरील डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
दुबईतीलच नाही तर जगातील सगळ्याच उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाची ओळख आहे. त्यामुळे याठिकाणी अनेक पर्यंटक आवर्जून भेट देतात. छान, फोटो व्हिडिओ काढतात. माधुरीनं भेट तर दिलीच पण नृत्यही केलं. माधुरीने दुबईत 'अश्विनी ये ना…' या सदाबहार मराठी गाण्यावर ठेका धरला आहे. हे गाणं सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्या 'गंमत जंमत' सिनेमातील असून किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणं गायलं आहे.
माधुरीनं डान्स व्हिडीओ शेअर करत याला 'बुर्ज खलिफा आणि मराठी गर्व…दोन्ही उंचच' असं कॅप्शन दिलं. माधुरी पवार या व्हिडीओमध्ये हिरव्या रंगाच्या को-ऑर्ड सेटमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या या व्हिडीओला हजारांहून अधिक लाईक आलेले पाहायला मिळत आहेत. नेटकऱ्यांनी तिच्या डान्स व्हिडीओवर सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद दिलाय.