अजबच ! 55 वर्षाचे मकरंद देशपांडे स्वतःपेक्षा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 09:00 AM2021-10-23T09:00:00+5:302021-10-23T09:00:00+5:30

मकरंद देशपांडेची गर्लफ्रेंड मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे.

Love has no age bars, check photos of Makarand Deshpande who has fallen in love with 20yrs younger girl than him | अजबच ! 55 वर्षाचे मकरंद देशपांडे स्वतःपेक्षा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात, पाहा फोटो

अजबच ! 55 वर्षाचे मकरंद देशपांडे स्वतःपेक्षा 20 वर्षांनी लहान तरुणीच्या प्रेमात, पाहा फोटो

googlenewsNext

प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांना वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. रंगभूमीवर रमणाऱ्या मकरंद यांनी हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. सध्या फिल्मी करिअरपेक्षा जास्त त्यांच्या अफेअरच्याच चर्चा रंगत असतात. मकरंद 55 वर्षाचे आहेत.  वाचून आश्चर्य वाटले असणार. पण मकरंद निवेदिता पोहनकर या तरुणीचे प्रेमात असल्याचे बोलले जाते.

 

निवेदिता आणि मकरंद यांच्या वयात तब्बल 20 वर्षांचे अंतर आहे. 2015 साली हे दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त आले होते. या दोघांचे लग्न झाले की नाही हे अद्याप उघड झालेले नाही. पण ठिकठिकाणी हे दोघे एकत्र दिसत असतात. मध्यंतरी निवेदिताने मकरंदसोबतचा एक सेल्फी शेअर करुन 'घरात चुकीला माफी नाही...' असे कॅप्शन फोटोला दिले होते. यावरुन दोघे बहुदा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

 

निवेदिता कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय... जाणून घेऊयात...

निवेदिता पोहनकर हे नाव चाहत्यांसाठी फारसे परिचयाचे नसावे. निवेदिता एक लेखिका असून पृथ्वी थिएटरशी जुळलेली आहे. रंगभूमीवर काम करत असतानाचा निवेदिता आणि मकरंद यांची भेट झाल्याचे म्हटले जाते. निवेदिताविषयी आणखी सांगायचे म्हणजे ती मराठी आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अदिती पोहनकर हिची धाकटी बहीण आहे.

अदितीला आपण रितेश देशमुख स्टारर लय भारी या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर बघितले आहे. निवेदिता स्पोर्ट्स आणि संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आहे. तिची आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय स्तरावरील हॉकी प्लेअर तर वडील सुधीर पोहनकर हे मॅरेथॉन चॅम्पिअन आहेत. तर काका पंडीत अजय पोहनकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक आहेत. मकरंद आणि निवेदिता यांच्या भेटीला नऊ ते दहा वर्षे झाली आहेत.

Web Title: Love has no age bars, check photos of Makarand Deshpande who has fallen in love with 20yrs younger girl than him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.