लग्नापूर्वीच्या जीवनाचा दिया लुटतेय आनंद
By Admin | Updated: October 6, 2014 02:49 IST2014-10-06T02:49:07+5:302014-10-06T02:49:07+5:30
अभिनेत्री दिया मिर्झा ही येत्या १८ आॅक्टोबर रोजी साहिल संघासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आपल्या लग्नाबात ती अत्यंत उत्साही आहे

लग्नापूर्वीच्या जीवनाचा दिया लुटतेय आनंद
अभिनेत्री दिया मिर्झा ही येत्या १८ आॅक्टोबर रोजी साहिल संघासोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. आपल्या लग्नाबात ती अत्यंत उत्साही आहे. एकदा का लग्न झाल्यानंतर बंधनात राहावे लागेल याची पुरेपूर कल्पना तिला आहे, त्यामुळे लग्नापूर्वीच्या मुक्त जीवनाचा आनंद सध्या ती लुटत आहे. दिया आणि साहिल यांचा साखरपुडा न्यूयॉर्क येथे झाला होता. अनेक कारणांमुळे त्यांचे लग्न वेळोवेळी लांबणीवर पडत गेले. आता दोघांनाही लग्नाची प्रतीक्षा आहे. ‘रहना हैं तेरे दिल में’ या रोमँटिक चित्रपटाद्वारे दियाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यावर्षी तिने ‘बॉबी जासूस’ या चित्रपटाचीही निर्मिती केली
होती. विद्या बालनची त्यात प्रमुख भूमिका होती.