Lokmat Most Stylish Award 2018 : 'पॉवरफुल्ल' अभिनेता राजकुमार राव ठरला 'पॉवर परफॉर्मर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 22:50 IST2018-12-19T22:49:47+5:302018-12-19T22:50:14+5:30
अभिनेता राजकुमार राव याला आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर' म्हणून सन्मानित करण्यात आलं.

Lokmat Most Stylish Award 2018 : 'पॉवरफुल्ल' अभिनेता राजकुमार राव ठरला 'पॉवर परफॉर्मर'
मुंबईः बॉलिवूडमधील 'टिप्पीकल' हिरोची चौकट मोडणारा, वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडणारा आणि त्या तितक्याच हटके स्टाइलनं सादर करणारा अभिनेता राजकुमार राव याला आज 'लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर' म्हणून सन्मानित करण्यात आलं.
मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सिनेमा, फॅशन, उद्योग, शिक्षण, राजकारण, प्रशासन या क्षेत्रांत आपल्या कामाने आणि व्यक्तिमत्वाने प्रभाव पाडणाऱ्या व्यक्तींना 'लोकमत'तर्फे मोस्ट स्टायलिश अवॉर्डने गौरवण्यात आलं. त्यातील राजकुमार राव हा ताराही चमकला.
लव्ह सेक्स और धोका, रागिनी एमएमएस, गँग्स ऑफ वासेपूर-२, काय पो छे, शहीद, क्वीन, न्यूटन ही सिनेमांची नावं पाहिली तरी त्यातील वेगळेपण सहज लक्षात येतं. या चित्रपटांमध्ये राजकुमार रावची भूमिका लक्षवेधी राहिली. त्याची प्रमुख भूमिका असलेल्या 'न्यूटन' भारताकडून ऑस्करसाठी पाठवला गेला होता. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या फन्ने खान, स्त्री, लव्ह सोनिया या सिनेमांमध्येही राजकुमार राव झळकला आणि २०१९ मध्येही त्याचे तीन सिनेमे येणार आहेत. त्याला मिळालेला 'पॉवर परफॉर्मर' पुरस्कार हा याच पॉवरफुल्ल कामगिरीचा गौरव आहे.