लॉकडाऊनमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसला बनवला 'फॅमिली बिझनेस'चा प्लान
By गीतांजली | Updated: November 11, 2020 18:47 IST2020-11-11T18:45:09+5:302020-11-11T18:47:01+5:30
निक आणि प्रियंका दोघेही ट्रेंडिग कपल म्हणून ओळखले जातात.

लॉकडाऊनमध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसला बनवला 'फॅमिली बिझनेस'चा प्लान
निक आणि प्रियंका दोघेही ट्रेंडिग कपल म्हणून ओळखले जातात. दोघांमध्येही जबरदस्त केमिस्ट्री आहे. लग्नानंतर या दोघांते नातंही अधिक घट्ट झाले आहे. लॉकडाऊन दरम्यान, त्यांनी एकमेकांसोबत बराच वेळ घालवला. क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना त्यांनी एका जॉईंट बिझनेस सुरु करण्याचा विचार केला आहे.
नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, लॉकडाऊनच्या वेळी स्टार कपलने एक दर्जेदार काम केले आहे. निकने आपल्या ताज्या मुलाखतीत सांगितले की, 'आम्ही खरोखर बर्याच गोष्टींवर एकत्र काम करत आहोत. अशा प्रकारे हा आता फॅमिली बिझनेस झाला आहे. '
अनेक पर्सनल प्रोजेक्ट्सवर काम करतायेत
निक आणि प्रियांकाचा हा पहिला ज्वाईंट वेंचर होऊ शकतो. पण त्यांचे पर्सनल प्रोजेक्ट्स बरेच आहेत ज्यावर ते स्वतंत्रपणे काम करत आहेत. प्रियांका वेगवेगळ्या चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
प्रियंका लवकरच राजकुमार राव सोबत ‘द व्हाईट टायगर’या सिनेमात दिसणार आहे.प्रियंकाने यात पिंकी नामक व्यक्तिरेखा साकारली आहे तर राजकुमारने अशोक नावाचे पात्र जिवंत केले आहे. आदर्श गौरव बलराम नामक ड्रायव्हरची भूमिका साकारली आहे. ड्रायव्हर बलरामला श्रीमंत व्हायचे असते. आधी तो यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो. मात्र एका वळणावर लवकरात लवकर पैसा कमवण्याच्या नादात तो चुकीच्या मागार्ला लागतो आणि या चित्रपटाची संपूर्ण कथा वेगळ्या वळणावर जाते.