चला पाहूया...मराठीत ‘बाजीराव मस्तानी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 19:50 IST2016-04-09T02:47:49+5:302016-04-08T19:50:29+5:30
‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने पुरस्कारांमध्ये आपला ठसा तर उमटविला, मात्र मराठमोळ्या तरुणाईच्या मनावर सुद्धा या चित्रपटाने अधिराज्य गाजविले. त्यामुळे ...

चला पाहूया...मराठीत ‘बाजीराव मस्तानी’
‘ ाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने पुरस्कारांमध्ये आपला ठसा तर उमटविला, मात्र मराठमोळ्या तरुणाईच्या मनावर सुद्धा या चित्रपटाने अधिराज्य गाजविले. त्यामुळे संजय लीला भन्साळी यांच्या या ड्रीम प्रोजेक्टने बॉक्स आॅफिसवर दणदणीत यश संपादन केले.
कल्पना करा, जर ‘बाजीराव मस्तानी’ सारखा भव्यदिव्य सिनेमा जर मराठीत करायचा झाला तर? आणि का हा विचार करून नये? पेशवाई तर मराठी साम्राज्याचे भूषण आहे. मग आपलाच इतिहास आपल्या मराठी भाषेत साकारला गेला तर, काय हरकत आहे? तसेही या चित्रपटात अनेक मराठी चेहरे होतेच की.
जर ‘बाजीराव मस्तानी’ मराठीत बनवायचा झाला तर पाहूया कोण कोणत्या भूमिकेत सूट होतय ते....
* बाजीराव : रणवीर सिंग ऐवजी बाजीरावच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता अंकु श नक्कीच बाजी मारेल. अॅक्शन असो वा रोमान्स, अंकु श कोणत्याही भूमिकेत अगदी सहज फिट बसतो. त्याच्या अभिनयातली वैविध्यता बाजीरावच्या भूमिकेसाठी योग्य ठरेल.
* काशीबाई : काशीबाईच्या सोज्वळ आणि नटखट भूमिकेत सई ताम्हणकरला पाहायला मराठी रसिकांना नक्कीच आवडेल. प्रियंकाने काशीबाईच्या भूमिकेचं सोनं केलं होतं, आपल्या सईला काशीबाईच्या भूमिकेत पाहणं म्हणजे सोन्याहून पिवळे.
* मस्तानी : मस्तानीच्या भूमिकेसाठी मात्र अनेक नायिकांमध्ये चढाओढ असेल. अगदी अमृता पासून उर्मिला, पूजा ते सोनाली पर्यंत. ह्या सर्व मस्तानीच्या पात्राला अगदी फिट बसतात. त्यातील अमृता खानविलकरला मस्तानीच्या भूमिकेत पाहण्याची कल्पना करूया. मस्तानीच्या भूमिकेसाठी आवश्यक असलेले नैसर्गिक सौंदर्य अमृतामध्ये नक्कीच आहे. तिच्या नृत्यकलेविषयीही काही शंका नाही.
![]()
* राधाबाई : बाजीरावच्या आईची भूमिका म्हणजेच राधाबाई यांची भूमिका तन्वी आझमींनी चोख बजावली. मात्र मराठीत या भूमिकेला खरा न्याय देऊ शकतील ते रीमा लागूच.
बाकी चिमाजी आप्पांच्या भूमिकेत आपला मराठमोळा वैभव अगदी फिट बसतोच. शाहू महाराजांच्या भूमिकेत महेश मांजरेकर आहेतच. एकंदरीतच मराठी ‘बाजीराव मस्तानी’ इतर मराठी चित्रपटांपेक्षा नक्कीच वेगळा ठरेल. मग या तगड्या स्टारकास्टसोबत कोणा कोणाला पाहायला आवडेल मराठी मराठी ‘बाजीराव मस्तानी’?
photo : zee talkies