सलमान म्हणणार चला हवा येऊ द्या...

By Admin | Updated: June 19, 2016 04:06 IST2016-06-19T04:06:02+5:302016-06-19T04:06:02+5:30

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची हवा आता बॉलीवूडमध्येही पसरली आहे. शाहरूख खानाने फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हापासूनच हिंदी

Let's say hello to Salman ... | सलमान म्हणणार चला हवा येऊ द्या...

सलमान म्हणणार चला हवा येऊ द्या...

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची हवा आता बॉलीवूडमध्येही पसरली आहे. शाहरूख खानाने फॅन या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. तेव्हापासूनच हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर कलाकारदेखील या शोवर येतील अशी चर्चा सुरू झाली होती.
आणि आता तर अशी खबर आहे की, दबंग सलमान खान चला हवा येऊ द्यामध्ये सुलतान या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. या खास भागासाठी तो लवकरच चित्रीकरणदेखील करणार आहे.
म्हणजे आता तर भाऊ कदम-सागर कारंडे-भारत गणेशपुरे-कुशल बद्रीके यांच्यासोबत भाईजानची मस्ती पाहण्याची सर्वांना उत्सुकता लागणार!

Web Title: Let's say hello to Salman ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.