बहू हमारी रजनी-कांत मालिका घेणार 5 वर्षाचा लीप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 12:34 IST2016-11-02T12:25:59+5:302016-11-02T12:34:53+5:30
गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका बंद होत नव्या मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. मालिकांमध्ये रोज काही ना काही नवीन ...

बहू हमारी रजनी-कांत मालिका घेणार 5 वर्षाचा लीप
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
गेल्या काही दिवसांपासून जुन्या मालिका बंद होत नव्या मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत. मालिकांमध्ये रोज काही ना काही नवीन देण्याच्या प्रयत्नांमध्ये इतर मालिकांनाही फटका बसतोय. काही दिवसांपूर्वी सुरू झालेली 'बहू हमारी रजनी - कांत' या मालिकेच्या रटाळ कथानकामुळे रसिक या मालिकेला पसंती देत नसल्याचे चित्र पाहायला मिळतेय. रसिकांनी बहू हमारी रजनी-कांत मालिकेकडे पाठ फिरवू नये त्याआधीच मालिकेत नाविण्य आणण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.लवकरच ही मालिका 5 वर्षाचा लीप घेणार आहेत. रोबो असलेल्या रजनीची मेमरी डिलीट करण्यात येणार आहे आणि त्यानंतर ही मालिका एक नवीन वळण घेणार आहे. येत्या 15 दिवसातच मालिका नवीन वळणावर पाहायला मिळणार आहे. मालिकेचे कथानक आणि मालिकेतील कलाकारांच्या हटके भूमिकांमुळे रसिक या मालिकेला पसंती देतील असे वाटले होते. मात्र काही दिवसानंतर मालिकेचा टीआरपी इतर मालिकेच्या तुलनेत कमी झाल्याचे पाहायला मिळाले. रोज नवनवीन प्रयोग मालिकांमध्ये करण्यात येतायेत. त्यामुळे मालिकेचे कथानक पाच वर्ष पुढे नेण्यात आल्याचे निर्माते आमिर जाफर यांनी सांगितले.करण व्ही ग्रोव्हरला सिनेमाची ऑफर मिळाल्यामुळे त्याने या मालिकेला टाटा बाय बाय करत सिनेमाच्या शूटींगला सुरूवात केली. त्यानंतर मालिकेत करण व्ही ग्रोव्हरच्या जागी राकेश बापटची वर्णी लागली. ऑनस्क्रीन राकेश बापट आणि रिध्दीमा पंडित यांची केमिस्ट्रीही रसिकांना आवडतेय. त्यामुळे मालिकेत पुन्हा एकदा नवनवीन ट्रॅक पाहायला मिळणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
![]()