‘मूव्ही लीक’चा आजार, बॉलीवूड बेजार!

By Admin | Updated: July 9, 2016 02:30 IST2016-07-09T02:30:51+5:302016-07-09T02:30:51+5:30

गत महिनाभरात तीन चित्रपट रीलीजपूर्वीच आॅनलाइन लीक झालेत. सेन्सॉर बोर्डासोबतच्या वादामुळे चर्चेत आलेल्या ‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक झाली. पाठोपाठ ‘ग्रेट ग्रँड मस्ती’

'Leak of movie leak', Bollywood bazar! | ‘मूव्ही लीक’चा आजार, बॉलीवूड बेजार!

‘मूव्ही लीक’चा आजार, बॉलीवूड बेजार!

गत महिनाभरात तीन चित्रपट रीलीजपूर्वीच आॅनलाइन लीक झालेत. सेन्सॉर बोर्डासोबतच्या वादामुळे चर्चेत आलेल्या ‘उडता पंजाब’ची सेन्सॉर कॉपी लीक झाली. पाठोपाठ ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ हा सेक्स कॉमेडी चित्रपट आॅनलाइन लीक झाला आणि यानंतर रीलीज व्हायच्या अगदी दोन दिवसांपूर्वी सलमान खान याचा बहुप्रतिक्षित ‘सुलतान’ लीक झाल्याची बातमी आली. चित्रपट लीक होण्याचे प्रमाण अलीकडे वाढल्याने याचा फटका थेट फिल्म मेकर्सला बसतो आहे. मेकर्सला धडकी भरवणारं हे ‘लीक पुराण’ प्रत्यक्षात आहे तरी काय? कसे लीक होतात सिनेमे? यावर प्रकाश टाकण्याचा हा एक प्रयत्न...

अमूक अमूक चित्रपट लीक झाल्याची बातमी आली की त्याचे मेकर्स असे काहीही नाही, असा छातीठोक दावा करतात. पण या दाव्यामागे असते एक भीती. लीकमुळे बॉक्स आॅफिसवरील कमाई प्रभावित होऊ नये याची. त्यामुळेच आॅनलाइन लीक म्हटले की प्रत्येक मेकर्सला धडकी भरते. प्रदर्शनापूर्वी चित्रपट लीक झाल्याने बॉक्स आॅफिसवरील कमाईला फटका बसतो. उदाहरण द्यायचे झाल्यास गतवर्षी आलेला नवाजुद्दिन सिद्दिकीचा ‘मांझी’, ‘उडता पंजाब’ आणि ‘सुलतान’चे घेता येईल. ‘मांझी’ रीलीज व्हायच्या दहा दिवसांपूर्वी लीक झाला आणि बॉक्स आॅफिसवर त्याला जोरदार फटका बसला. ‘उडता पंजाब’ व ‘सुलतान’ प्रदर्शनाच्या दोन दिवस आधी लीक झालेत; पण बॉक्स आॅफिसच्या या चित्रपटांच्या कमाईवर फार काही परिणाम झाला नाही. ‘सुलतान’बद्दल म्हणाल तर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स आॅफिसचे रेकॉर्ड तोडले. त्याहीआधी ‘सैराट’ लीक झाल्याच्याही बातम्या आल्या. पण तरीही या चित्रपटाचे बॉक्स आॅफिसवर अभूतपूर्व यश मिळवले. एकंदर सांगायचे तर लीकचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतो. पण जाणकारांच्या मते हा परिणाम केवळ १० टक्के असतो. प्रत्यक्षात चांगला चित्रपट असेल तर चालणारच...!

हेही चित्रपट झाले होते लीक :
उडता पंजाब’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ आणि ‘सुलतान’ केवळ हेच नाही, तर प्रदर्शनापूर्वी लीक झालेले अनेक चित्रपट आहेत. त्यांवर एक नजर...

१. मांझी : नवाजुद्दिन सिद्दिकी व राधिका आपटे अभिनीत दशरथ मांझी याच्या आयुष्यावर बेतलेला ‘मांझी’ रीलीजच्या दहा दिवसांपूर्वी लीक झाला होता. बॉक्स आॅफिसवर याचा मोठा फटका या चित्रपटाला बसला.
२. ‘तेरा क्या होगा जानी’ : नील नितीन मुकेश, के के मेनन, सोहा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट म्हणजे ‘जॉनी गद्दार’चा सिक्वल. या चित्रपटाचा बराचसा भाग प्रदर्शनापूर्वी आॅनलाइन लीक झाला. मेकर्सने याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता.
३. बजरंगी भाईजान : सलमान खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटही प्रदर्शनापूर्वी लीक झाला. मात्र याउपरही हा चित्रपट तुफान गाजला.
४. पा : बिग बी अमिताभ, अभिषेक बच्चन आणि विद्या बालन यांचा ‘पा’ हा चित्रपट रीलीजच्या दिवशीच आॅनलाइन लीक झाला होता.
५. मोहल्ला अस्सी : सनी देओल अभिनीत हा चित्रपटही प्रदर्शनापूर्वी लीक झाला.

कसे लीक होतात चित्रपट?
कुठल्याही चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शन प्रोसेसमध्ये हजारो लोक काम करतात. एडिटर्सला वेगळी कॉपी आणि स्पेशल इफेक्ट देणाऱ्यांना वेगळी अशा विविध स्तरावर काम होते. या टीममधील एखाद्याकडून चित्रपट लीक होण्याची शक्यता असते. अनेकदा निष्काळजीपणा आणि बेजबाबदार वर्तन हेही कारण असते.
हॅकिंग हेही एक प्रमुख कारण आहे. सन २०१४मध्ये सायबर हॅकर्सनी सोनी पिक्सर्च स्टुडिओचा डेटा सर्वर हॅक करून अनेक चित्रपटांचे स्क्रिप्ट्स व चित्रपट इंटरनेटवर लीक केले होते. ‘गार्जियन आॅफ पीस’ या संघटनेने या सायबर हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. अर्थात सोनी पिक्चर्स हॅकिंगसारखा हल्ला क्वचित घडतो. मात्र पोस्ट प्रॉडक्शनमध्ये सहभागी असलेल्या अनेक थर्ड पार्टी कंपन्यांना हॅक करणे कठीण नसते.
जेव्हा लीक झालेला चित्रपट पाहता तेव्हा त्या प्रिंटच्या खाली अनेकदा ‘धीस कॉपी बिलाँग टू एलेन डेजेनेरस असे लिहिलेले आढळले. याचा अर्थ चित्रपट रीलीज होण्यापूर्वी त्याची कॉपी कॉर्पोरेट करारबद्ध कंपन्या वा टेलिव्हिजन होस्टपर्यंत पोहोचतात. यातूनही लीक होण्याचा धोका असतो.

Web Title: 'Leak of movie leak', Bollywood bazar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.