रेहमानसाठी पुन्हा गाणार लतादीदी?
By Admin | Updated: January 8, 2015 23:20 IST2015-01-08T23:20:39+5:302015-01-08T23:20:39+5:30
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि जागतिक कीर्तीचा संगीतकार ए.आर. रेहमान यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी दिली.

रेहमानसाठी पुन्हा गाणार लतादीदी?
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि जागतिक कीर्तीचा संगीतकार ए.आर. रेहमान यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी दिली. ती गाजलीही. आता लतादीदींनी ेरेहमानसोबत पुन्हा गायची इच्छा व्यक्त केलेय. यासाठी निमित्त ठरला तो रेहमानचा वाढदिवस. मी सध्या गाणं बंद केलं असलं तरी रेहमानची इच्छा असेल तर त्याच्यासाठी नक्की गाईन, असं त्यांनी सांगितलं. ही त्याच्यासाठी माझ्याकडून वाढदिवसाची भेट असेल असंही त्या म्हणाल्या. आता हा सुवर्णयोग कधी येतोय याची वाट या दोघांचे चाहते बघत असतील.