लारा दत्ताचे पुनरागमन
By Admin | Updated: October 6, 2014 02:53 IST2014-10-06T02:53:15+5:302014-10-06T02:53:15+5:30
गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी लारा दत्ता ही आपला पती महेश भूपतीच्या चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

लारा दत्ताचे पुनरागमन
गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडपासून दूर राहिलेली अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी लारा दत्ता ही आपला पती महेश भूपतीच्या चित्रपटातून पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. २०११ या वर्षी रिलीज झालेल्या ‘चलो दिल्ली’ या कॉमेडी चित्रपटाचा
रिमेक ती बनवणार आहे. ‘चलो चायना’ असे या चित्रपटाचे नाव आहे. टेनिसपटू आणि लाराचा पती महेश भूपती हा स्वत: या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आले. लारा यात एका खेडूत तरुणीची भूमिका साकारणार असून, अभिनेता के. के. मेनन सोबत रोमान्स करणार आहे.