'लक्ष्मी निवास'मधील मंगलाने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना दिला उजाळा, स्वाती देवल म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 20:35 IST2025-05-12T20:34:30+5:302025-05-12T20:35:28+5:30

Swati Deval : स्वाती देवलने अलिकडेच उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

'Lakshmi Niwas' fame mangala Aka Swati Deval brought back memories of summer vacation, Actress said... | 'लक्ष्मी निवास'मधील मंगलाने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना दिला उजाळा, स्वाती देवल म्हणाली...

'लक्ष्मी निवास'मधील मंगलाने उन्हाळ्यातील सुट्टीच्या आठवणींना दिला उजाळा, स्वाती देवल म्हणाली...

'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत मंगलाची भूमिका अभिनेत्री स्वाती देवलने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. दरम्यान स्वाती देवल(Swati Deval)ने अलिकडेच उन्हाळ्याच्या सुट्टीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 स्वाती देवलने सांगितले की, "माझी उन्हाळा सुट्टी फारच वेगळी असायची कारण वर्षभर अभ्यास, कथकचे क्लासेस आणि सुट्टी पडली की तो सर्व ताण भरून काढण्यासाठी भरपूर झोपायचे, कारण सकाळची शाळा असायची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लागली पाहिजे म्हणून बाबांनी सकाळच्या शाळेत घातले होते. सुट्टी पडली की मी स्वतःबरोबर खूप खेळायची कारण मला असे भरपूर मित्र- मैत्रिणी नव्हते. माझ्या शाळेत फक्त दोन मैत्रिणी होत्या सोनाली खरे आणि केतकी सुतावणे. त्या आपल्या गावी जायच्या किंवा त्यांचे इतर प्लान असायचे, माझं गाव नव्हते जे काही असायचे ते माझ्या बिल्डिंग आणि घरापर्यंतच. मी भातुकली जमवायचे, आई मला चुरमुरे द्यायची आणि खाली बसून मी आपले खेळ खेळायचे. सकाळी लवकर उठायची बाबांनी सवय लावल्याने सुट्टीत सकाळी फुलं वेचायची, देवाची पूजा करायची, एक गोष्ट जी अनिवार्य होती ती म्हणजे पाढे म्हणायची. कारण बाबा म्हणायचे की पाढे आयुष्यभर कामी येणार. 

''जे बाळकडू आईकडून मिळाले त्याचा...''

ती पुढे म्हणाली की, मी उन्हाळा सुट्टीत आत्या किंवा मामाकडे जायचे, नाहीतर आमच्याकडे मामेबहिणी राहायला यायच्या. आई-बाबांसोबत बाहेरचा प्लान बनला तर तिकडे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आईचं ठरलेलं असायचं बटाट्याचा किस, साबुदाण्याचे साणगे,लोणच, मुरांबा, कैरीचं पन्हं, अनेक प्रकारचे पापड, आंब्याचं कायरस एक प्रकार आहे जो सारस्वतांचा आहे, तो आमच्याकडे नियमितपणे बनायचाच. मी आईला या सर्व गोष्टींमध्ये मदत करायची. यामुळे मला स्वयंपाकाची आवड लहानपणापासून लागली. या सगळ्या चांगल्या सवयी माझ्या मुलाला लागाव्या म्हणून मी मुलाच्या बरोबरीने या गोष्टी बनवते आणि तो ही मला मदत करतो. जे बाळकडू आईकडून मिळाले त्याचा पुरेपूर वापर मी माझ्या संसारात करत आहे. 


आता उन्हाळा सुट्टी मिळाली तर मला फिरायला जायला खूप आवडेल. मी लेह-लदाख , काश्मीर, आणि बरीच थंड ठिकाण फिरले आहे, अलिबाग आमचं गाव आहे आम्ही तिकडेही जातो. नरसोबाच्या वाडीला ही जातो. अशा सर्व ठिकाणी मला फिरायला आवडेल, असे स्वातीने सांगितले.

Web Title: 'Lakshmi Niwas' fame mangala Aka Swati Deval brought back memories of summer vacation, Actress said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.