'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:53 AM2024-05-14T09:53:01+5:302024-05-14T09:54:14+5:30

कुशल बद्रिकेने त्याच्या बाबांची आणि जत्रा सिनेमाची भावूक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय. ती वाचून तुमच्याही डोळ्यात येेईल पाणी (kushal badrike)

kushal badrike emotional story about his father who death while he shooting jatra movie | 'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं

'जत्रा'चं शूटींग सुरु झालं अन् बाबांचं निधन..; कुशलने सांगितलेल्या आठवणीने सर्वांना रडवलं

मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिके हा सर्वांचा लाडका  कलाकार. गेली अनेक वर्ष विविध कॉमेडी शोच्या माध्यमातून कुशल सर्वांना खळखळून हसवतोय. कुशल बद्रिकेे सध्या 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये काम करतोय. कुशल बद्रिकेने या शोमध्ये त्याच्या पहिल्या सिनेमाची भावूक आठवण सांगितली आहे. ही आठवण ऐकून अभिनेत्री हुमा कुरेशी आणि सर्वांच्याच डोळ्यातून पाणी आलं. 

कुशलने 'मॅडनेस मचाएंगे'च्या सेटवर भावूक आठवण सांगितली आहे. २००५ ला आलेला 'जत्रा' हा कुशलचा पहिला सिनेमा. या सिनेमाचं शूटींग करायला कुशल उत्सुक. आयुष्यातला पहिला सिनेमा त्यात मोठ्या पडद्यावर दिसणं म्हणजे कुशलची उत्सुकता शिगेला. 'जत्रा' सिनेमाचं शुटींगचं पहिलं शेड्यूल झालं आणि कुशलच्या बाबांचं निधन झालं. कुशलने बाबांचं निधन झाल्यावर मुंडन केल्याने पुढे सिनेमाच्या continuity ला काहीशी अडचण आली पण सिनेमा पूर्ण केला.

पुढे 'जत्रा' सिनेमा रिलीज झाला. 'जत्रा' च्या स्क्रीनींगच्या वेळी कुशल आईला घेऊन आला होता. सिनेमाच्या इंटर्व्हलला कुशलने मागे वळून पाहिलं तर त्याची आई त्याच्या बाबांचा फोटो घेऊन सिनेमा पाहत होती. ही आठवण सांगताना कुशलच्या डोळ्यात पाणी आलं. "जत्रा सिनेमाने आम्हा सर्वांना घडवलं. आज त्या सिनेमातला प्रत्येकजण मराठीतला सुपरस्टार आहे", असं कुशल म्हणाला.

Web Title: kushal badrike emotional story about his father who death while he shooting jatra movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.