कुणाल अमिताभचा जावई!
By Admin | Updated: February 10, 2015 23:30 IST2015-02-10T23:30:05+5:302015-02-10T23:30:05+5:30
रंग दे बसंती’, ‘आजा नचले’ या चित्रपटांतील कुणाल कपूरची नवी इनिंग सुरू झाली आहे. कुणाल कपूर नैना बच्चनशी सोमवारी विवाहबंधनात अडकला.

कुणाल अमिताभचा जावई!
‘रंग दे बसंती’, ‘आजा नचले’ या चित्रपटांतील कुणाल कपूरची नवी इनिंग सुरू झाली आहे. कुणाल कपूर नैना बच्चनशी सोमवारी विवाहबंधनात अडकला. नैना ही शहेनशहा अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू अजिताभ आणि रमोला यांची मुलगी आहे. हा लग्नसोहळा परदेशात अत्यंत खासगीपणे पार पडला. अभिनयात फारसा ठसा उमटवलेला नसला तरी कुणालला आता अमिताभचा जावई म्हणून जास्त ओळखले जाईल, नाही का?