टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुस-यांदा घेणार काडीमोड, चार वर्षांतच मोडला संसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 11:12 IST2020-03-12T11:12:40+5:302020-03-12T11:12:51+5:30
4 वर्षांपूर्वी केले होते कोर्ट मॅरेज...

टीव्हीची ही लोकप्रिय अभिनेत्री दुस-यांदा घेणार काडीमोड, चार वर्षांतच मोडला संसार
‘कुमकुम’ या लोकप्रिय मालिकेची अभिनेत्री मेघा गुप्ता हिचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. 2016 मध्ये मेघाने अभिनेता सिद्धांत कर्णिकसोबत लग्न केले होते. पण आता लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. खरे तर लग्नानंतर तीनच वर्षांनी दोघे एकमेकांपासून विभक्त झाले होते. आता दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एका ताज्या मुलाखतीत खुद्द सिद्धांतने ही माहिती दिली. मेघा व त्याच्या नात्याबद्दल तो भरभरून बोलला. तो म्हणाला,‘ हे नातं वाचवण्यासाठी आम्ही आमच्याकडून जे शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र नात्यात जी मानसिक शांतता हवी असते ती आम्हाला मिळू शकली नाही. हे लग्न टिकावे म्हणून आम्ही थेरपीसाठी सुद्धा गेलो. जे काही शक्य होते, ते सगळे केले. मात्र त्यातून काहीही सकारात्मक घडले नाही. गतवर्षी मार्च आम्ही वेगवेगळे राहू लागलो होतो. वेगळं राहिल्याने कदाचित आम्ही पुन्हा जवळ येऊ, असा आमचा एक अंदाज होता. पण तो अंदाजही फसला. अखेर आम्ही परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.’
मी आता स्वत:सोबत रिलेशनशिपमध्ये आहो आणि माझा मी आनंदी आहे. लग्नानंतर आपण आधी जोडीदाराचा विचार करतो आणि नंतर स्वत:बद्दल. हे योग्य नाही, असेही तो म्हणाला.
फेमस टीव्ही कपलने 2016 मध्ये कोर्ट मॅरेज केले होते. कार्तिक सोबत मेघाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने ‘शादी फेम’चा मालक आदित्य श्रॉफ सोबत लग्न केले होते. पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. याशिवाय मेघाने टीव्ही अभिनेता नमन शॉला डेट केले आहे.
मेघा गुप्ता टीव्ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध कलाकार आहे. मेघाने काव्यांजली, कुमकुम, सीआयडी, मैं तेरी परछाई हूं, ड्रीम गर्ल आणि यहा मै घर घर खेली या मालिकांमध्ये काम केले आहे.
सिद्धांत कर्णिकने एक था राजा एक थी राणी या मालिकेत शेवटचे काम केले. यानंतर तो टीव्ही पासून दूर आहे. त्याआधी त्याने वे रिमिक्स, माही वे, रिश्ता डॉट कॉम, प्यार की ये एक कहानी, गुस्ताख दिल आणि ये है आशिकी या मालिकांमध्ये काम केले.