KRK in Politics: केआरके राजकारणात उतरणार! पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; नेटकरी म्हणाले, कोणाचे दिवस भरलेत...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 04:17 PM2022-09-15T16:17:48+5:302022-09-15T16:18:59+5:30

KRK in Politics: केआरकेने याची घोषणा करताच कोणाचे दिवस भरलेत अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केआरकेची फिरकी घेतली आहे.

KRK in Politics: KRK will enter politics! thinking into the political party; users said, whose days are finished | KRK in Politics: केआरके राजकारणात उतरणार! पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; नेटकरी म्हणाले, कोणाचे दिवस भरलेत...

KRK in Politics: केआरके राजकारणात उतरणार! पक्षात प्रवेश करण्याची घोषणा; नेटकरी म्हणाले, कोणाचे दिवस भरलेत...

googlenewsNext

अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान याने मोठी घोषणा केली आहे. गेल्या महिन्याच्या अखेरीस केआरकेला वादग्रस्त ट्विट प्रकरणी अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच त्याला जामिन मिळाला होता. आता त्याने राजकारणात उतरण्याची घोषणा केली आहे. 

केआरकेने याची घोषणा करताच कोणाचे दिवस भरलेत अशा शब्दांत नेटकऱ्यांनी केआरकेची फिरकी घेतली आहे. त्याने गुरुवारी सकाळी ट्विट करत सिने इंडस्ट्रीच नाही तर राजकीय क्षेत्रातही खळबळ उडवून दिली आहे. 'मी लवकरच राजकीय पक्षात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. कारण देशात सुरक्षित राहण्यासाठी अभिनेता नाही तर नेता असणे आवश्यक आहे.', असे ट्विट केआरकेने केले आहे. 

या त्याच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिल्या आहेत. केआरकेला पक्षात घेण्यास कोण तयार झालेय? कोणाचे दिवस फिरलेत अशा आशयाच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींनी केआरकेने अद्याप राजकीय पक्षात प्रवेश केलेला नाही तर त्याने फक्त सांगितले आहे, अशाही काहींनी बाजू घेतल्या आहेत. एकाने तर एकाने बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

१० दिवसांत १० किलो वजन...
एका युजरने तर तू अभिनेता कधीपासून झालास असा सवाल केला आहे.  मी १० दिवस तुरुंगात होतो तेव्हा निव्वळ पाण्यावर जगलो होतो. त्यामुळे माझे १० किलो वजन कमी झाले आहे, असे ट्विट केआरकेने केले होते. त्यावरही नेटकऱ्यांनी त्यांची शाळा घेतली होती. एकाने लिहले की, वैद्यकीयदृष्ट्या हे कसे शक्य आहे? प्रचंड श्रम करून आणि फक्त पाणी पिऊनही, १० दिवसांत १० किलो वजन कमी करणे अशक्य आहे. दुसर्‍याने लिहिले की इथून आणखी १० किलो स्नायू गमावण्याची कल्पना करा. एकीने लिहले की ‘१० दिवसात १० किलो वजन कमी झाले तुम्हाला जर २ महिने तुरुंगात ठेवलं तर तुम्ही अमर व्हाल.

Web Title: KRK in Politics: KRK will enter politics! thinking into the political party; users said, whose days are finished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.