किंग खान शाहरुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:25 IST2016-01-16T01:15:25+5:302016-02-13T04:25:26+5:30

'तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले' असे ज्या कलाकारबद्दल आवर्जून बोलले जाते तो बॉलिवूडचा बादशहा व किंग खान म्हणजेच ...

King Khan Shahrukh | किंग खान शाहरुख

किंग खान शाहरुख

'
;तो आला, त्याने पाहिले, त्याने जिंकले' असे ज्या कलाकारबद्दल आवर्जून बोलले जाते तो बॉलिवूडचा बादशहा व किंग खान म्हणजेच शाहरुख खान. शाहरुखने सोमवारी आपल्या वयाची पन्नास वर्षे पूर्ण केली. त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या घराबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. रोहित शेट्टीच्या 'दिलवाले'ची शूटिंग आटोपून तो आपल्या वाढदिवशी मुंबईत परतला. पन्नासावा वाढदिवस हा आयुष्यात मैलाचा दगड आहे. हा दिवस मला घरच्यांपेक्षा चाहत्यांसोबत साजरा करताना आनंद होतो आहे, असे शाहरुखने एका खास कार्यक्रमात सांगितले. दुपारी 3 वाजता शाहरुख प्रसिद्धी माध्यमांशी बोलणार होता. मात्र तब्बल 3 तास उशीरा आल्यानंतर त्यांने चर्चेसाठी बराच वेळ दिला. शाहरुखने मनमोकळय़ा गप्पा करताना आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. 'वाढदिवसाची सुरुवातच चाहते घराबाहेर जमले आहेत अशा वाक्याने होते. मन्नतसमोर जमलेल्या अनेक चाहत्यांचे अभिवादन स्वीकारयाचे. मीडियाशी बोलायले, मित्रांना भेटायचे, त्याच्या ग्रिटींग्स स्वीकरायच्या, पुन्हा चाहत्यांसमोर जायचे असा माझा कार्यक्रम ठरलेला असतो' असे शाहरुख म्हणाला.

Web Title: King Khan Shahrukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.