कॅटरिना बनणार मान्यता दत्त
By Admin | Updated: November 3, 2014 01:50 IST2014-11-03T01:50:39+5:302014-11-03T01:50:39+5:30
‘पी के’ची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची योजना राजकुमार हिराणीने आखली आहे.

कॅटरिना बनणार मान्यता दत्त
‘पी के’ची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनेता संजय दत्त याच्या जीवनावर चित्रपट तयार करण्याची योजना राजकुमार हिराणीने आखली आहे. या चित्रपटात रणबीर कपूर हा संजय दत्तची, तर कॅटरिना कैफही संजयची पत्नी मान्यता दत्त हिची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीर आणि कॅटने यापूर्वी ‘अजब प्रेमकी गजब कहानी’ आणि ‘राजनीती’ या चित्रपटांमध्ये एकत्रित काम केले आहे. अनुराग बसूच्या ‘जग्गा जासूस’ या चित्रपटात सध्या रणबीर काम करीत आहे. विशेष म्हणजे कॅटरिनाच त्याची हिरोईन आहे. संजय दत्त आणि हिराणी यांची मैत्री जगजाहीर आहे. संजयची जीवनकथा एका चित्रपटापेक्षा कमी नसल्याचे हिराणीने म्हटले आहे.