"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
By कोमल खांबे | Updated: October 11, 2025 08:36 IST2025-10-11T08:36:04+5:302025-10-11T08:36:36+5:30
एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजानेदेखील करवाचौथ साजरी केली. सुनिताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं. तर गोविंदानेही पत्नीला खास गिफ्ट दिलं.

"सोना कितना सोना है...", घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान करवाचौथला गोविंदाने बायकोला दिला सोन्याचा हार
करवाचौथ या सणाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दरवर्षी मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरी करतात. यावर्षीही बॉलिवूड अभिनेत्रींनी करवाचौथ हा सण साजरा केला. एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना बॉलिवूड अभिनेता गोविंदाची पत्नी सुनिता अहुजानेदेखील करवाचौथ साजरी केली. सुनिताने पती गोविंदासाठी व्रत ठेवलं होतं. तर गोविंदानेही पत्नीला खास गिफ्ट दिलं.
सुनिता अहुजाने करवाचौथसाठी खास लूक केला होता. हिरव्या रंगाच्या आऊटफिटमध्ये ती सजली होती. करवाचौथला गोविंदाने पत्नीला खास सोन्याचं गिफ्ट दिलं आहे. भला मोठा सोन्याचा हार गोविंदाने सुनिताला करवाचौथला गिफ्ट केला आहे. गोविंदाच्या पत्नीने सोशल मीडियावरुन गोविंदाने दिलेल्या या गिफ्टचा फोटो शेअर केला आहे. "सोना कितना सोना है...माझं करवाचौथ गिफ्ट" असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुनिता आणि गोविंदा त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुनिता आणि गोविंदा एकत्र राहत नाहीत. त्यामुळेच त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चाही रंगल्या होत्या. गणेशोत्सवात त्यांचं पूर्ण कुटुंब एकत्र दिसलं होतं. तर आता करवाचौथचा सणही त्यांनी एकत्र साजरा केला आहे.