करण जोहरला 'क' अक्षरापासून वाटतेय भीती
By Admin | Updated: March 9, 2017 13:39 IST2017-03-09T13:28:16+5:302017-03-09T13:39:18+5:30
एकीकडे वडील झाल्याचा आनंद असतानाच दुसरीकडे करण जोहरला क अक्षरापासून जबरदस्त भीती वाटू लागली आहे.

करण जोहरला 'क' अक्षरापासून वाटतेय भीती
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - वडील झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत असलेल्या दिग्दर्शक-निर्माता करण जोहरकडून त्याचा खास मित्रपरिवार पार्टी देण्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे करण जोहरचा आगामी सिनेमा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' शुक्रवारी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. यामुळे करणसाठी आनंदाचा डबल धमाका आहे. आनंदाच्या या वातावरणात, करणने नुकतेच दिलेल्या एका मुलाखतीत केलेले वक्तव्य धक्का देणारे होते. मुलाखतीत करण म्हणाला की, या क्षणी मी खूप खूश आहे. मात्र
का कोण जाणे आयुष्य 'क' अक्षर विचित्र पद्धतीने घोळ निर्माण करत आहे.
माझं स्वतःचे नावदेखील 'क' अक्षरावरुनच आहे. मात्र 'कॉफी विथ करण' शोमध्ये अभिनेत्री कंगना राणौतला बोलावल्यापासून प्रत्येक दिवशी कंगना अशी काही विधानं करत आहे, ज्यामुळे माझं नावदेखील प्रसिद्ध माध्यमांमध्ये येत आहे. 'प्रत्येकवेळी स्वतःचा बळी गेल्याचे दाखवण्याच्या कंगनाच्या स्वभावाची आता सवय झाली आहे. या इंडस्ट्रीमुळे तिला जर एवढाच त्रास होत असेल, अडचणी येत असतील तर तिने ही इंडस्ट्री सोडावी' असे करणने म्हटले. शिवाय, 'आपल्या वक्तव्य करण्याऐवजी तिने स्वतःच्या निर्णयावर पुन्हा विचार करावा', असा सल्लाही करणने दिला होता.
यावर कंगनानेही करणाला खडेबोल सुनावले आहेत. 'एक स्त्री आहे म्हणून करण स्त्रीत्वाचा अपमान का करत आहे? असा सवाल तिने विचारला. हे ' वूमन कार्ड' आणि 'व्हिक्टीम कार्ड' काय असतं? हे असे शब्द वापरणे म्हणजे स्त्रियांचा अपमान करण्यासारखेच आहे. 'वूमन कार्ड' वापरुन तुम्हाला विम्बल्डन चॅम्पियन बनता येत नाही की ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकता येत नाही, ना राष्ट्रीय पुरस्कार मिळवता येत नाही किंवा नोकरीही मिळत नाही ' अशा शब्दांत कंगनाने करणला प्रत्युत्तर दिले आहे.
'मी मला जमेल ती कार्ड्स वापरते, कामाच्या, स्पर्धेच्या ठिकाणी कठोरतेचे तर कुटुंबीय, मित्रांसह प्रेमाचं कार्ड वापरते. जगाशी लढा देता आत्मसन्मानाचे कार्ड आणि बसमध्ये सीट मिळवण्यासाठी 'स्त्रीत्वा'चे कार्ड वापरते. आपण हे समजून घेतले पाहिजे की आपण लोकांशी नव्हे तर त्यांच्या मानसिकतेशी लढा देत आहोत. मी करण जोहरविरोधात नव्हे तर त्याच्या पुरूषी मानसिकतेविरुद्ध लढत आहे' असेही कंगनाने 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.
कंगनानंतर करणला कमाल राशिद खानपासून समस्या आहे. बॉम्ब वेलवेट सिनेमातील करणच्या भूमिकेवर कमालेन बरीच टीका केली होती. यावर करणने असे सांगितले की, 'आजवर मी यांपैकी एकाही बद्दल एक चकार शब्दही बोललेलो नाही. तरीही केआरके स्वतःच्या शोमध्ये माझे नाव घेऊन काही-न्-काही बरळतोच.'
अशा पद्धतीने काही जण माझ्याबाबत विधानं करुन इंडस्ट्री आणि मीडियाचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करू इच्छित आहेत, जे माझ्या दृष्टीने अजिबात चांगले नाही.