छक्का म्हणणा-याचं करण जोहरनं केलं तोंड बंद
By Admin | Updated: April 25, 2017 09:45 IST2017-04-25T09:12:05+5:302017-04-25T09:45:26+5:30
बॉलिवूड कलाकारांना सोशल मीडियावर ब-याचदा अनेकांकडून टार्गेट केले जाते. यावेळस बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला टार्गेट करण्यात आले आहे.

छक्का म्हणणा-याचं करण जोहरनं केलं तोंड बंद
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - बॉलिवूड कलाकारांना सोशल मीडियावर ब-याचदा अनेकांकडून टार्गेट केले जाते. केवळ टार्गेटच नाही तर खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका-टिप्पणीही केली जाते. यावेळस बॉलिवूडचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरवर निशाणा साधण्यात आला आहे.
एका ट्विटर युजरनं मर्यादा ओलांडत करण जोहरवर टीका केल्याचे पाहायला मिळाले. संबंधित व्यक्तीला करणही जशाचं तसं उत्तर देऊन त्यांचं तोंड बंद केले आहे.
करण जोहरला एका युजरनं "छक्का" म्हणत त्याच्यावर टीका केली. यावर करण अतिशय गांभीर्यानं प्रत्युत्तर देत त्याची बोलतीच बंद केली.
"छक्का" म्हणून उल्लेख करणारा व्यक्ती लवकरच बरा होवो, अशी मी अपेक्षा करतो. औषधं घ्यायला विसरू नये", असं खोचक ट्विट करत करणने त्याला गप्प केले आहे.
एका पत्रकाराने करण जोहरच्या घेतलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले होते की,"एक छक्का दुस-या छक्क्याची मुलाखत घेत आहे."
यावर करणनं उपरोधिक पद्धतीने प्रत्युत्तर देत म्हटले की, "तुमची प्रकृती लवकर सुधारावी अशी मी अपेक्षा करतो. औषधं घ्यायला विसरू नये." सोशल मीडियावर करण जोहरची थट्टा होण्याची ही पहिलीच वेळ नाही.
Tripathiji...a very happy Sunday to you....I hope you recover quickly....don"t forget your meds! Also make sure you gargle 2 hourly! https://t.co/hqGrxQm45D— Karan Johar (@karanjohar) April 23, 2017