कपिलचीबॉलीवूड एंट्री
By Admin | Updated: August 26, 2014 02:19 IST2014-08-26T02:19:28+5:302014-08-26T02:19:28+5:30
अॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अब्बास मस्तान ही दिग्दर्शक जोडी आता एका कॉमेडी चित्रपटात हात आजमावणार आहेत.

कपिलचीबॉलीवूड एंट्री
अॅक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेली अब्बास मस्तान ही दिग्दर्शक जोडी आता एका कॉमेडी चित्रपटात हात आजमावणार आहेत. या चित्रपटात कॉमेडियन कपिल शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग नोव्हेंबर महिन्यात सुरू होणार आहे. कपिलनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. एका प्रादेशिक चित्रपटाच्या म्युझिक लाँच समारंभात सहभागी झालेला कपिल म्हणाला की, ‘अब्बास मस्तान यांच्या चित्रपटाचे शूटिंग मी नोव्हेंबरमध्ये सुरू करणार आहे. चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही.’ कपिलने यापूर्वी यशराज बॅनरचा ‘बँकचोर’ हा चित्रपट साईन केला होता; पण तारखांच्या समस्येमुळे तो या चित्रपटातून बाहेर पडला. त्यानंतर रितेश देशमुखला या चित्रपटासाठी साईन करण्यात आले. सध्या कपिल त्याच्या शोमध्ये बिझी असून, लवकरच तो दुबईत हा शो लाईव्ह शूट करणार आहे.