बापरे! चुकीच्या रुट कॅनलमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:35 IST2022-06-20T15:26:04+5:302022-06-20T15:35:04+5:30
Kannada Actress Swathi Sathish : कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश हिची सर्जरीमुळे वाईट अवस्था झाली आहे. चुकीच्या सर्जरीचा तिच्या चेहऱ्यावर परिणाम झाला असून तिला ओळखणं देखील अवघड झालं आहे.

बापरे! चुकीच्या रुट कॅनलमुळे अभिनेत्रीच्या चेहऱ्याची झाली भयंकर अवस्था; फोटो पाहून बसेल धक्का
नवी दिल्ली - अभिनेत्री या आणखी सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर वेगवेगळ्या सर्जरी करत असतात. त्यांच्यासाठी त्यांचा चेहरा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. पण अनेकदा याचा शरीरावर विपरित परिणाम देखील पाहायला मिळतो. खूप जणांची भयंकर अवस्था होते. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सर्जरी करणं एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. कन्नड अभिनेत्री स्वाती सतीश (Kannada Actress Swathi Sathish) हिची सर्जरीमुळे वाईट अवस्था झाली आहे.
चुकीच्या सर्जरीचा तिच्या चेहऱ्यावर परिणाम झाला असून तिला ओळखणं देखील आता अवघड झालं आहे. रिपोर्टनुसार, स्वाती सतीशने दातांसाठी रुट कॅनल सर्जरी केली पण डॉक्टरांच्या चुकीमुळे तिचा चेहरा खराब झाला आहे. सध्या अभिनेत्रीचे सर्जरीनंतरचे फोटो व्हायरल होत आहेत. ज्यात तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला आहे. संपूर्ण चेहऱ्याला सूज आली असून तिला पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
स्वातीने काही दिवसांपूर्वी बंगळूरु येथे रुट कॅनल केलं. त्यानंतर तिच्या चेहऱ्याला सूज आली आणि दुखू लागलं. हे दुखणं 2-3 दिवसात थांबेल असं तिच्या डॉक्टरांनी सांगितलं. पणं असं काहीच न होता स्वातीचा चेहरा आणखी खराब होत गेला. स्वातीच्या चेहऱ्याची सूज कमी झाली नाही. आपल्याबाबत काहीतरी चुकीचं झालं असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने तात्काळ दुसऱ्या डॉक्टरांकडे धाव घेतली.
धक्कादायक प्रकारानंतर स्वातीने तिच्या डॉक्टरांवर गंभीर आरोप लावले आहेत. स्वातीने 'डॉक्टरांनी रुट कॅनल करताना मला चुकीची आणि अर्धवट माहिती दिली. ट्रीटमेंट दरम्यान एनेस्थेशिया ऐवजी सेलिसिलिका एसिड देण्यात आलं असं म्हटलं आहे. स्वाती दुसऱ्या डॉक्टरकडे केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. यामुळे स्वातीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.