कंगना बनणार आधुनिक हीर
By Admin | Updated: December 5, 2014 23:31 IST2014-12-05T23:31:06+5:302014-12-05T23:31:06+5:30
दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठीही कंगना राणावतचीच निवड केली आहे

कंगना बनणार आधुनिक हीर
दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी त्यांच्या आगामी चित्रपटासाठीही कंगना राणावतचीच निवड केली आहे. सध्या कंगना त्यांच्या तनू वेड्स मनू या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये काम करत आहे. आनंद यांचा आगामी चित्रपट हीर रांझावर आधारित असणार आहे. या चित्रपटात कंगना आधुनिक काळातील हीरची भूमिका साकारणार आहे. आनंद यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट कंगनाला डोळ्यासमोर ठेवूनच लिहिली आहे. क्वीन या चित्रपटानंतर कंगनाला एक अभिनेत्री म्हणून गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. ती सध्या तनू वेड्स मनू-२, कट्टीबट्टी, मिस्टर चालू आणि डिव्हाईन लवर्स या चित्रपटांमध्ये काम करत आहे.