करण जोहरबद्दल काय आहेत काजोलच्या भावना

By Admin | Updated: February 20, 2017 15:23 IST2017-02-20T12:56:26+5:302017-02-20T15:23:50+5:30

मागच्यावर्षी करण जोहर आणि काजोलची 20 वर्षापासूनची मैत्री तुटल्याच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये अनेकांना धक्का बसला होता.

Kajol's feelings about Karan Johar | करण जोहरबद्दल काय आहेत काजोलच्या भावना

करण जोहरबद्दल काय आहेत काजोलच्या भावना

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 20 - मागच्यावर्षी करण जोहर आणि काजोलची 20 वर्षापासूनची मैत्री तुटल्याच्या बातमीने इंडस्ट्रीमध्ये अनेकांना धक्का बसला होता. काजोलच्या होम प्रोडक्शनची निर्मिती असलेला 'शिवाय' आणि करण जोहरचा 'ए दिल हैं मुश्किल' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले. त्यावरुन वाद झाला होता.  काजोलचा पती अजय देवगणने करण जोहरवर 'शिवाय' चित्रपटाच्या नकारात्मक प्रचारासाठी 25 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता. 
 
त्यानंतर करणने त्याच्या 'अॅन अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रात काजोलबरोबर झालेल्या भांडणावर काही गौफ्यस्फोट केले होते. अजय देवगणने माझ्यावर आरोप केल्यानंतर काजोलने त्यावेळी घेतलेल्या भूमिकेने मला धक्काच बसला. त्यामुळे आमची दोन दशकांची मैत्री तुटली. 
 
अलीकडे काजोलला करणबरोबर झालेल्या वादावर प्रश्न विचारला. त्यावेळी तिने थेट उत्तर देण्याचे टाळले. ती एवढेच म्हणाली की, नातेसंबंध नाजूक असतात. त्याचा बॉलिवुडशी संबंध नाही करणबरोबर जे झाले त्यावर आपण भाष्य करणार नाही.
 

Web Title: Kajol's feelings about Karan Johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.