काजोलचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर

By Admin | Updated: November 17, 2014 02:10 IST2014-11-17T02:10:53+5:302014-11-17T02:10:53+5:30

अभिनय आणि मधुर हास्याने चाहत्यांना सुखावणाऱ्या अभिनेत्री काजोलचे पडद्यावरील पुनरागमन तिसऱ्यांदा लांबणीवर पडले आहे. ‘वुई आर फॅमिली’

Kajol's comeback is over again | काजोलचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर

काजोलचे पुनरागमन पुन्हा लांबणीवर

अभिनय आणि मधुर हास्याने चाहत्यांना सुखावणाऱ्या अभिनेत्री काजोलचे पडद्यावरील पुनरागमन तिसऱ्यांदा लांबणीवर पडले आहे. ‘वुई आर फॅमिली’ या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून काजोल यापूर्वी रसिकांना भेटली होती. तिला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. काजोलने काही दिवसांपूर्वी ‘हाऊ ओल्ड आर यू’ या हिट मल्याळम चित्रपटाचे अधिकार खरेदी केले होते. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकद्वारे ती पुनरागमन करील, अशी चर्चा होती; परंतु या चित्रपटाच्या निर्मितीत अडथळे येत आहेत. चित्रपटाच्या सर्व रिमेकचे दिग्दर्शन आपणच करू, अशी अट मूळ चित्रपटाच्या दिग्दर्शकाने घातली होती; परंतु अजय देवगणला ते मान्य नाही. अश्विनी धीर या आपल्या आवडीच्या दिग्दर्शकावर ही जबाबदारी सोपविण्याचा त्याचा मानस होता. परिणामी, काजोलचे पुनरागमन लांबणीवर पडले आहे.

Web Title: Kajol's comeback is over again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.