काजोलनं सांगितलं नवरोबाचं गुपित, अजय देवगणला आहे ‘हा’ विचित्र आजार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 16:14 IST2021-10-22T16:13:30+5:302021-10-22T16:14:33+5:30
Ajay Devgn's Into The Wild With Bear Grylls : ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ या शोमध्ये काजोलने दोन गोष्टींचा खुलासा केला आहे. होय, आजपर्यंत कोणालाही ठाऊक नसतील, अशी नवरोबाची दोन सीक्रेट तिनं सांगितली आहेत.

काजोलनं सांगितलं नवरोबाचं गुपित, अजय देवगणला आहे ‘हा’ विचित्र आजार
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता रजनीकांत आणि अक्षय कुमारनंतर आता ‘इंटू द वाइल्ड विथ बेअर ग्रील्स’ (Into The Wild With Bear Grylls) या शोमध्ये बॉलिवूडचा सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgn) हजेरी लावणार आहे. अजयच्या या भागाचा प्रीमिअर डिस्कव्हरी प्लस अॅपवर आज 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 25 ऑक्टोबर रोजी हा एपिसोड डिस्कव्हरीवर प्रदर्शित होईल. साहजिकच बेअर ग्रील्स आणि अजयच्या या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अजयची पत्नी काजोल (Kajol) हिची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचली आहे. खास म्हणजे, शोमध्ये काजोलही अजयबद्दल अनेक गोष्टी शेअर करताना दिसणार आहे.
शोमध्ये काजोलने दोन गोष्टींचा खुलासा केला आहे. होय, आजपर्यंत कोणालाही ठाऊक नसतील, अशी नवरोबाची दोन सीक्रेट तिनं सांगितली आहेत.
पहिलं सीक्रेट म्हणजे, अजय देवगण खूप चांगला कूक आहे. दुसरं सीक्रेट काय तर अजयला बॉर्डरलाइन ओसीडी आहे. होय, तळहाताच्या बोटांनी कशालाही स्पर्श करताना अजयला अडचण येते. एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यानंतर बोटांचा वास जाता जात नाहीये, असं वाटून तो अस्वस्थ होतो.
ब्रेअर ग्रील्ससोबतच्या या शोमध्ये अजयने आपल्या या आजारावर मात करावी, अशी काजोलची इच्छा आहे. त्यासाठी काजोलने अजयला तसं चॅलेंजही दिलं आहे. शोदरम्यान अतिदुर्गंधी वा वास येणाºया सर्व वस्तूंना अजयने स्पर्श करावा. मग बघू काय होतंय, असं चॅलेंज तिनं अजयला दिलं आहे.
अजय देवगणनंतर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल देखील बेअर ग्रील्सच्या या शोमध्ये सहभागी होणार आहे.
अजयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अजय देवगमचा भूज: द प्राइड आॅफ इंडिया या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. लवकरच तो मैदान आणि गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.