प्रतिष्ठीत संगीतकार पं रामाश्रेय झा यांची जयंती..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2016 11:48 IST2016-08-11T11:48:56+5:302016-08-11T11:48:56+5:30

प्रतिष्ठीत संगीतकार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान आणि शिक्षक पं रामाश्रेय झा यांची आज (११ ऑगस्ट) जयंती.

Jubilee of noted music composer Pandit Ram Jha | प्रतिष्ठीत संगीतकार पं रामाश्रेय झा यांची जयंती..

प्रतिष्ठीत संगीतकार पं रामाश्रेय झा यांची जयंती..

>संजीव वेलणकर
पुणे, दि. ११ -  प्रतिष्ठीत संगीतकार, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान आणि शिक्षक पं रामाश्रेय झा यांची आज (११ ऑगस्ट) जयंती.
पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे. मा.जितेंद्र अभिषेकी यांनी मा. पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये मा.कमला बोस,मा. शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत. २००५ मध्ये पं रामाश्रेय झा यांना  संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता मा.पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले. मा.पं रामाश्रेय झा यांना लोकमत समूहाकडून आदरांजली.
 
संदर्भ:- इंटरनेट

Web Title: Jubilee of noted music composer Pandit Ram Jha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.