जिती जागती हॉट 'मस्त मस्त चीज' मशिनमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2017 21:35 IST2017-02-22T21:35:34+5:302017-02-22T21:35:34+5:30

हम्मा-हम्मा, लैला में लैला, सारा जमाना आणि तम्मा तम्मा या आयटम नंबरला मिळालेल्या यशानंतर 90 च्या दशकाती आणखी एक गाणं नव्या रूपात दिसेल.

Jaiti Jagati Hot 'Mast Mast Cheez' machine | जिती जागती हॉट 'मस्त मस्त चीज' मशिनमध्ये

जिती जागती हॉट 'मस्त मस्त चीज' मशिनमध्ये

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - हम्मा-हम्मा, लैला में लैला, सारा जमाना आणि तम्मा तम्मा या आयटम नंबरला मिळालेल्या यशानंतर 90 च्या दशकाती आणखी एक गाणं नव्या रूपात दिसेल. मोहरा चित्रपटात अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत केलेलं तू चीज बडी है मस्त मस्त ह्या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होतं. आता हेचं गाण पुन्हा एकदा नव्या स्वरुपात येणार आहे.

निर्माता-दिग्दर्शक अब्बास-मस्तान यांचा आगामी चित्रपट मशीनमध्ये हे गाणं नव्या रूपात दिसणार आहे. या गाण्यावर नव्या दमाचा अभिनेता मुस्तफा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी ही जोडी थिरकताना दिसणार आहे. या गाण्यात मुस्तफाच्या डोळ्यांवर अक्षयसारखेच डार्क ग्लासेस दिसतील. बोस्को या गाण्यात कोरिओग्राफर असेल. हे गाणे तयार झाल्यानंतर सर्वप्रथम अक्षयला दाखवले जाणार आहे.

तू चीज बडी है मस्त मस्त... हे मूळ गाणे उदित नारायण यांनी गायले होते. या गाण्याचे नवे व्हर्जनही उदित नारायण हेच गाणार आहेत. फरक एवढाच की यातील गायिका मात्र बदललेली असेल. नव्या व्हर्जनमध्ये कविता कृष्णमूर्ती नाही तर गायिका नेहा कक्कड हिचा आवाज ऐकायला मिळणार आहे.

Web Title: Jaiti Jagati Hot 'Mast Mast Cheez' machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.