जॅकी चॅनची ती सायकल चाहत्याने घेतली 10 लाखात
By Admin | Updated: January 25, 2017 12:32 IST2017-01-25T12:32:36+5:302017-01-25T12:32:36+5:30
'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चॅनने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती.

जॅकी चॅनची ती सायकल चाहत्याने घेतली 10 लाखात
tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - 'कुंग फू योगा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अॅक्शन स्टार जॅकी चॅनने कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कपिल शर्माच्या सेटवर कुंग फू योगाच्या सर्व टीमने मस्ती केली. जॅकी चॅन आणि सोनू सूद यांनी आपल्या हटके अंदाजात कपिल शर्माच्या सेटवर एन्ट्री केली होती. सुत्रांच्या माहितीनुसार जॅकी चॅन ज्या सायकलवर कपिल शर्माच्या सेटवर आला होता, ती सायकल तब्बल 10 लाख रुपयाला विकली गेली आहे.
कपिल शर्माच्या शो मधील एका चाहत्ताने ती सायकल 10 लाख रुपयाला विकत घेतली. शेख फैजल असे त्या चाहत्याचे नाव आहे, मिळालेली ही रक्कम कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले जातं आहे.
अभिनेता सोनू सूद, अमायरा दस्तूर आणि दिशा पटानी हे भारतीय कलाकार कुंग फू योगा या चित्रपटात झळकणार आहेत. कुंग फू योगा हा एक अॅक्शन एडव्हेंचर कॉमेडी चित्रपट आहे. जॅकी चॅनचा हा चित्रपट 3 फेब्रुवारीला भारतात प्रदर्शित होणार आहे तर भारताच्या 3 दिवस आधी 28 जानेवारीला चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. कुंग फू योगा हा चित्रपट स्टैनले टोंगने दिग्दर्शित केला आहे.