मर्द को दर्द नहीं होता !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2016 13:28 IST2016-08-08T07:58:30+5:302016-08-08T13:28:30+5:30
वेदना सहन केल्याशिवाय फळ काही मिळत नाही. या उक्ती तंतोतंत लागू पडतेय ती अभिनेता नमिक पॉलला.छोट्या पडद्यावरील 'एक दूजे ...

मर्द को दर्द नहीं होता !
व दना सहन केल्याशिवाय फळ काही मिळत नाही. या उक्ती तंतोतंत लागू पडतेय ती अभिनेता नमिक पॉलला.छोट्या पडद्यावरील 'एक दूजे के वास्ते' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारा नमिकला दुखापत झाली. फिटनेसबद्दल बराच जागरुक आणि काटेकोर असणारा नमिक जिममध्ये बराच घाम गाळतो. नुकतंच जिममध्ये पंच मारताना नमिकच्या हाताला इजा झाली. ही इजा इतकी गंभीर होती की त्याचा हात सुजला. मात्र नमिकनं जिममध्ये वर्कआऊट करणं थांबवलं नाही. तशाच अवस्थेत तो जिममध्ये वर्कआऊट करत राहिला अन् ही सूज आणखी वाढलीय. त्यामुळं मर्द को दर्द नहीं होता हेच जणू नमिकला दाखवून द्यायचं तर नव्हतं ना.