लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 10:35 IST2025-07-31T10:35:11+5:302025-07-31T10:35:52+5:30
आई आणि लेकाच्या हाताला सलाईन, आपल्या नवजात मुलीला वेळ देऊ शकली नाही इशिता

लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट
बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ताने (Ishita Dutta) काही दिवसांपूर्वीच मुलीला जन्म दिला. मात्र लेकीच्या जन्मानंतर इशिताची तब्येत बिघडली आहे. तसंच तिचा दोन वर्षांचा मुलगा वायूचीही तब्येत खराब आहे. इशिताने स्वत:च सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. तसंच तिने हाताला सलाईन लावलेला फोटोही शेअर केला आहे. मात्र इशिताला नक्की झालं काय वाचा.
इशिता दत्ताने इन्स्टाग्राम स्टोरीवर हाताला सलाईन लावलेला फोटो दाखवला आहे. तसंच तिचा दोन वर्षांचा मुलगा वायुच्याही हाताला सलाईन लावलेला फोटो आहे. यासोबत तिने लिहिले, "हा महिना माझ्यासाठी खूपच कठीण होता. ज्यावेळी मी खरं तर माझ्या नवजात मुलीजवळ असलं पाहिले होतं त्यावेळी मी रुग्णालयात चकरा मारत होते. सुदैवाने मी आणि वायु आता बरे होत आहोत. अनेकांनी मला माझ्या वेट लॉसबद्दल विचारलं. ते जाणूनबुजून झालेलं नाही तर काही दिवसांपासून तब्येत खराब असल्याने माझं वजन घटलं आहे."
इशिता दत्ताने १० जून रोजी मुलीला जन्म दिला. कुटुंबाच्या उपस्थितीत घरीच बारसं केल्याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. यात तिने वेदा नाव ठेवल्याचं जाहीर केलं. मात्र इशिताचं घटलेलं वजन पाहून अनेकांनी तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त केली होती. त्यावरच तिने आता हे अपडेट दिलं आहे.
इशिता दत्ता 'दृश्यम' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आली. तिने टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे. तर तिचा पती वत्सल सेठही अभिनेता आहे. अजय देवगणच्या 'टार्झन द वंडर कार'मधून तो लोकप्रिय झाला होता. लेकीच्या जन्मानंतर वत्सल आणि इशिताचं कुटुंब पूर्ण झालं आहे.