इरफानचे फेसबुक अकाउंट हॅक

By Admin | Updated: December 19, 2015 02:53 IST2015-12-19T02:53:15+5:302015-12-19T02:53:15+5:30

सिनेअभिनेता इरफान खानचे फेसबुक अकाउंट बुधवारी काही वेळापुरते हॅक करण्यात आले होते. मात्र याची माहिती त्याच्या टीमला मिळताच ते अकाउंट रिस्टोअर करण्यात आले.

Irfan's Facebook Account Hack | इरफानचे फेसबुक अकाउंट हॅक

इरफानचे फेसबुक अकाउंट हॅक

मुंबई : सिनेअभिनेता इरफान खानचे फेसबुक अकाउंट बुधवारी काही वेळापुरते हॅक करण्यात आले होते. मात्र याची माहिती त्याच्या टीमला मिळताच ते अकाउंट रिस्टोअर करण्यात आले. जैसलमेर येथे शूटिंगमध्ये व्यग्र असलेल्या इरफानला याबाबत काहीच माहिती नव्हती.
बुधवारी इरफान खानचे
फेसबुक अकाउंट हॅक करून त्यावर तणाव निर्माण होऊ शकेल, अशा आशयाची पोस्ट टाकण्यात आली. इरफानच्या टीमचे लक्ष जाताच प्रकरण वाढण्याआधीच त्यांनी ते अकाउंट रिस्टोअर केले. या प्रकरणी सायबर गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
या वर्षीच्या आॅगस्टमध्ये अमिताभ बच्चन आणि सप्टेंबरमध्ये शाहिद कपूरचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. यापूर्वी सचिन तेंडुलकर, हृतिक रोशन आणि मनीषा कोईरालालाही सायबर गुन्ह्यांचा ताप सहन करावा लागला होता. हृतिक रोशनने सायबर पोलिसांकडे तक्रारही केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Irfan's Facebook Account Hack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.