‘आयपीएल’ येणार भेटीला!
By Admin | Updated: December 2, 2014 02:34 IST2014-12-02T02:31:38+5:302014-12-02T02:34:54+5:30
मराठमोळं ‘आयपीएल’ येतंय. म्हणजे ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे.

‘आयपीएल’ येणार भेटीला!
मराठमोळं ‘आयपीएल’ येतंय. म्हणजे ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे. या चित्रपटाचा म्युझिक लॉंन्च सोहळा नुकताच खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत झाला. एमआरपी फिल्म्स प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते मोहन पुरोहित आहेत. दीपक कदम यांनी तो दिग्दर्शित केला आहे. शीतल उपरे याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. शीतलसोबत स्वप्नील जोशी ज्युनिअर, विजय पाटकर, विजय कदम, संतोष मयेकर, सिया पाटील, सुनील तावडे, उषा साटम, लेखा राणे आदी कलाकारही या चित्रपटात आहेत. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.