"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 02:39 PM2024-04-27T14:39:49+5:302024-04-27T14:54:43+5:30

IPL 2024 : पंजाब किंग्सचा खेळ पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाले. सामना संपल्यानंतर त्यांनी X वर ट्वीट केलं होतं.

ipl 2024 amitabh bachchan tweet after punjab kings win against kkr said khel khatm paisa hajam | "IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

"IPL मध्ये चाललंय तरी काय...", अमिताभ बच्चन यांचं ट्वीट व्हायरल

बिग बी अमिताभ बच्चन बॉलिवूडचे महानायक आहेत. त्यांनी अभिनयाने संपू्र्ण सिनेसृष्टी गाजवली. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. पण, अभिनयाबरोबरच बिग बी खेळातही रुची दाखवतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ट्वीट करत ते व्यक्त होताना दिसतात. त्यांचे ट्वीट व्हायरलही होत असतात. आता अमिताभ यांनी आयपीएलबद्दल केलेलं ट्वीट चर्चेत आलं आहे. 

शुक्रवारी आयपीएलमधील पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. केकेआरने २६१ धावांचं आव्हान पंजाबसमोर ठेवलं होतं. पंजाब किंग्सने १८.४ षटकांतच २६२ धावा करत विजय मिळवला. या सामन्यात पंजाबने केवळ २ बळी गमावले. पंजाब किंग्सचा हा खेळ पाहून बिग बीदेखील आश्चर्यचकित झाले. सामना संपल्यानंतर त्यांनी X वर ट्वीट केलं होतं. "खेल खतम पैसा हजम", असं अमिताभ बच्चन यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. 

त्यानंतर आज पुन्हा अमिताभ बच्चन यांनी आयपीएलबद्दल ट्वीट केलं आहे. "आयपीएलमध्ये चाललंय तरी काय...कालचा खेळ तर एकदम पैसा वसूल होता", असं बिग बींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. 

दरम्यान, याआधी बिग बींनी मुंबई इंडियन्ससाठी ट्वीट केलं होतं. राजस्थान रॉयल्स विरुद्धचा सामना हरल्यानंतर बिग बींनी नाराजी व्यक्त केली होती. "आयपीएल पाहिली...आता झोपुया" असं ट्वीट त्यांनी केलं होतं. तर ब्लॉग मध्ये त्यांनी "मुंबई इंडियन्सचा पराभव झाल्यामुळे निराश आहे. दु:खी आहे...पण, आता वेगळा दिवस आणि वेगळ्या लाइफसाठी सज्ज", असं म्हटलं होतं. 

Web Title: ipl 2024 amitabh bachchan tweet after punjab kings win against kkr said khel khatm paisa hajam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.