Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:10 IST2025-09-27T13:06:16+5:302025-09-27T13:10:46+5:30
'इंडियन आयडल १२' (Indian Idol 12) या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) लवकरच आई होणार आहे.

Indian Idol 12 फेम सायली कांबळे लवकरच होणार आई, सोशल मीडियावर दिली खुशखबर!
'इंडियन आयडल १२' (Indian Idol 12) या लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी गायिका सायली कांबळे (Sayli Kamble) लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर डोहाळे जेवणाचे फोटो शेअर करत तिने ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे.
सायली कांबळेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो पोस्ट केले आहेत. पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने तिचे डोहाळे जेवण साजरे करण्यात आले. फोटोंमध्ये ती हिरवी साडी, नाकात नथ आणि फुलांचे दागिने घालून अत्यंत आनंदात दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मातृत्व फुलल्याचा आनंद स्पष्टपणे झळकत आहे. सोबतच तिचा पती धवलदेखील तिच्या या आनंदात सहभागी झालेला दिसत आहे.
फोटो शेअर करताना सायलीने एक भावनिक कॅप्शनही लिहिले आहे. तिने देवाचे आभार मानले असून लवकरच नवा पाहुणा तिच्या आयुष्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तिने लिहिले की, "आमच्या मनात आनंद आणि उत्कंठा दाटून आली आहे. मी आणि धवल तुम्हाला हे सांगताना खूप उत्साहित आहोत की, आमचं छोटंसं बाळ लवकरच जगात येणार आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील सर्वात अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात करत आहोत आणि आमच्या बाळाला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत. खूप सारं प्रेम घेऊन तो/ती आमच्या भेटीला येत आहे." या पोस्टवर 'इंडियन आयडल'मधील तिचे मित्र-मैत्रिणी आणि बॉलिवूडमधील कलाकारांसोबतच तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गायनाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या सायलीने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली आहे. आता लग्नाच्या तीन वर्षानंतर ती आई होणार असल्याने तिच्या आयुष्यात एक नवीन आणि सुंदर टप्पा सुरू होत आहे.