मी सिंगलच
By Admin | Updated: February 3, 2016 02:26 IST2016-02-03T02:26:45+5:302016-02-03T02:26:45+5:30
सिनेसृष्टीत कोणत्या हीरोइनचे कोणासोबत अफेअर सुरू आहे? कोणत्या हीरोला कोणासोबत पाहिले? अशा हॉट न्यूजची चर्चा नेहमीच होत असते.

मी सिंगलच
सिनेसृष्टीत कोणत्या हीरोइनचे कोणासोबत अफेअर सुरू आहे? कोणत्या हीरोला कोणासोबत पाहिले? अशा हॉट न्यूजची चर्चा नेहमीच होत असते. अगदी प्रेक्षकही या असल्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असतात; परंतु ‘अप्सरा आली’ या गाण्यातून सर्वांची लाडकी बनलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सर्वांना सांगतेय, ‘मी अजून सिंगलच आहे.’
तू एवढी मोठी सेलीब्रिटी आहेस, तुझी फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे; मग तुला नक्कीच कधी कोणी प्रपोज केलं असेल? यावर ती म्हणते, ‘मी सिंगल लाइफमध्येच खूप उत्सुक आहे.’ आणि एवढ्यात तरी काही लग्न करायचा विचार नसल्याचे तिने स्पष्टपणे ‘लोकमत-सीएनएक्स’शी बोलताना सांगितले.
तुला स्वयंवर करायला लावले तर तू काय करशील? या प्रश्नावर सोनाली म्हणते, ‘मी तिथून अदृश्य होईन.’ आता पाहू या सोनालीचे हे सिंगल स्टेटस किती दिवस असेच राहतेय की थोड्या दिवसांत बदलतेय.