हवा असेल तर पुरस्कार परत घ्या, अक्षय कुमार संतापला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2017 11:23 IST2017-04-25T10:00:20+5:302017-04-25T11:23:42+5:30
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर होणा-या टिकेला उत्तर देताना खिलाडी अक्षय कुमारने हवं असेल तर पुरस्कार परत घ्या अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

हवा असेल तर पुरस्कार परत घ्या, अक्षय कुमार संतापला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर होणा-या टिकेला उत्तर देताना खिलाडी अक्षय कुमारे हवं असेल तर पुरस्कार परत घ्या अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमारला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. 26 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अक्षय कुमारला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
"जेव्हा कोणी पुरस्कार जिंकतं, तेव्हा त्यासंबंधी चर्चा होत असते. मी गेल्या 25 वर्षांपासून हे ऐकत आहे. हे काही नवीन नाही. कोणीही असलं तरी वाद होतोच. हा जिंकायला हवा होता, याने जिंकायला नको होतं अशा चर्चा होत असतात. मी 26 वर्षांनी पुरस्कार जिंकलो आहे. जर तुमची इच्छा असेल तर तोदेखील परत घ्या असं अक्षय कुमार बोलला आहे.
अक्षय कुमारला ‘रुस्तम’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. यामधील काहींनी दंगलमधील आमीर खान आणि मनोज वाजपेयाची अलीगडमधील भूमिका दुर्लक्षित केली असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे राष्ट्रीय पुरस्कार ज्यूरी चेअरमनपदी दिग्दर्शक प्रियदर्शन असल्याने त्यांनी अक्षयला पुरस्कार दिल्याचंही काहीजण बोलू लागले.
अक्षय कुमारने आपल्याला पुरस्कार जाहिर झाल्यानंतर होणा-या टिकेला उत्तर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबई मिररशी बोलताना अक्षयने सांगितलं होतं की, "मला चित्रपटसृष्टीत 25 वर्ष झाली आहेत. पण मी कधीही एखादा चित्रपट किंवा पुरस्कार मला मिळायला हवा होतो असं म्हटलेलं नाही". अक्षयला पद्म पुरस्कार मिळण्याच्या शक्यतेवर विचारण्यात आल्यावर त्यासाठी खूप परिश्रम आणि महत्वाचं काम करावं लागतं. त्यानंतर तुम्ही त्यासाठी योग्य असता असं लोकांना वाटतं अशी प्रतिक्रिया दिली.