त्यापेक्षा मी लग्न करेन
By Admin | Updated: December 20, 2014 21:13 IST2014-12-20T21:13:17+5:302014-12-20T21:13:17+5:30
सलमान खान सध्या लग्न करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. खुद्द सलमानने सांगितले की, पुढच्या वर्षी तिन्ही खानांसोबत काम करण्यापेक्षा त्याला लग्न करायला जास्त आवडेल.
त्यापेक्षा मी लग्न करेन
सलमान खान सध्या लग्न करण्याच्या मूडमध्ये दिसतोय. खुद्द सलमानने सांगितले की, पुढच्या वर्षी तिन्ही खानांसोबत काम करण्यापेक्षा त्याला लग्न करायला जास्त आवडेल. एका पुरस्कार समारंभात सलमानला जेव्हा विचारण्यात आले की, २०१५ मध्ये स्वत:ला विवाहित पुरुष म्हणून पाहायला आवडेल की, आमिर खान आणि शाहरुख खानसोबत एकाच चित्रपटात काम करायला आवडेल. त्यावर त्याने उत्तर दिले की, ‘मी तिन्ही खानांच्या एका चित्रपटात काम क रण्यापेक्षा स्वत:ला विवाहित रूपात पाहू इच्छितो. यावरून तरी सलमान आता त्याच्या परदेशी गर्लफ्रेंडसोबत लवकरच विवाहबद्ध होईल’, अशी अपेक्षा व्यक्त तेली जाते.