आलियाशी लग्न करायचंय

By Admin | Updated: February 8, 2015 00:57 IST2015-02-08T00:57:29+5:302015-02-08T00:57:29+5:30

‘बिग बॉस ८’चा विजेता अभिनेता गौतम गुलाटीचा आनंद गगनात मावत नाहीये. गौतम गुलाटीने बॉलिवूड ब्युटी आलिया भटसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

I want to marry Alia | आलियाशी लग्न करायचंय

आलियाशी लग्न करायचंय

‘बिग बॉस ८’चा विजेता अभिनेता गौतम गुलाटीचा आनंद गगनात मावत नाहीये. गौतम गुलाटीने बॉलिवूड ब्युटी आलिया भटसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आलिया खूप चांगली मुलगी आहे. मी आणि आलिया एकाच जिममध्ये जातो, पण मी लाजराबुजरा असल्यामुळे आम्ही कधीच एकमेकांशी बोललेलो नाही, असंही गौतम सांगतो. बिग बॉसमध्ये अनेक सहकलाकारांशी रोमान्स करणाऱ्या गौतम गुलाटीला बॉलिवूडमधल्या कोणत्या हीरोईनसोबत लग्न करण्याची इच्छा आहे, असा प्रश्न विचारला होता. त्या वेळी त्याने कोणत्याही हीरोईनसोबत लग्न करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. मात्र आलिया भट याबाबतीत अपवाद असल्याचेही त्याने पुढे स्पष्ट केले.

 

Web Title: I want to marry Alia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.