"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 09:44 IST2025-08-20T09:43:41+5:302025-08-20T09:44:16+5:30

Usha Nadkarni: ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी खुलासा केला आहे की, वयाच्या ७९ व्या वर्षीही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांच्या कुटुंबात एक मुलगा, सून आणि नात आहे, परंतु ते त्यांच्यासोबत राहत नाहीत.

"I live alone, my son does not live with me...", 79-year-old Usha Nadkarni said, expressing her sorrow over living a lonely life... | "एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...

"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...

टीव्ही आणि चित्रपट अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) ज्या उषा ताई किंवा आऊ म्हणून ओळखल्या जातात, त्या आता ७९ वर्षांच्या आहेत. 'पवित्र रिश्ता' फेम उषा ताई अलीकडेच 'सेलिब्रिटी मास्टर शेफ'मध्येही दिसल्या होत्या. हिंदी तसेच मराठी कलाविश्वातील या ज्येष्ठ अभिनेत्रीने आता खुलासा केला आहे की, या वयातही त्या मुंबईत एकट्या राहतात. त्यांचा मुलगा, सून आणि नात एकत्र राहत नाहीत. उषा नाडकर्णी सांगतात की, त्यांनी 'स्वतंत्र जीवनशैली' स्वीकारली आहे आणि एकटे राहणे आणि जगणे शिकल्या आहेत.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी सांगितले की, त्या गेल्या ३८ वर्षांपासून एकट्याच राहत आहेत. जेव्हा त्या एकट्या राहू लागल्या तेव्हा त्यांना भीती वाटत होती. पण आता त्यांना त्याची सवय झाली आहे. १९७९ मध्ये मराठी चित्रपट 'सिंहासन'मधून पदार्पण करणाऱ्या उषा नाडकर्णींचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी १९४६ मध्ये मुंबईत झाला. त्या म्हणाल्या की, "माझ्या मुलाला नॉनव्हेज खूप आवडते. पण माझा मुलगा माझ्यासोबत राहत नाही. तो बोरिवली येथे भावाच्या घरी राहतो."

अभिनेत्री जगताहेत एकाकी आयुष्य
उषा नाडकर्णी म्हणाल्या की, १९८७ पासून त्यांच्या मुलाचे लग्न झाल्यापासून त्या एकाकी जीवन जगत आहेत. त्यांच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल त्या म्हणतात, ''मी एकटी राहते. मी सकाळी उठते, नाश्ता बनवते, मग जेवण बनवते, आंघोळ करते आणि देवाला प्रार्थना करते. नंतर, मी जेवण करते आणि फेसबुक पाहते.''

मुलगा, सून आणि नात का राहत नाहीत एकत्र? 
जेव्हा ज्येष्ठ अभिनेत्रीला विचारण्यात आले की, त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत का राहत नाही, तेव्हा त्या म्हणाल्या की, ''लग्नानंतर मुलगा माझ्या भावाच्या फ्लॅटमध्ये राहू लागला, कारण त्याचे मोठे घर होते आणि त्याला एक मुलगीदेखील आहे. माझा भाऊ बोरिवलीमध्ये राहत होता. त्याच्याकडे २ बीएचके होते. आता ते पुन्हा ३ बीएचकेमध्ये विकसित झाले आहे. माझ्या मुलाला एक लहान मुलगी आहे, म्हणून भावाने मला तिथे यायला सांगितले होते. सर्वांना लहान मुले आवडतात, म्हणून तो मुलीसोबत तिथे असतो.''

''आई-वडील आणि भावाने मुलाचं केलं संगोपन''
मुलाखतीदरम्यान, उषा नाडकर्णी यांनी कबूल केलं की त्यांच्या भावाने आणि त्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलाला वाढवण्यात खूप मदत केली. त्या म्हणाल्या की, त्या काळात ती काम आणि शूटिंगमुळे सतत व्यग्र असायची. माझे वडील वयाच्या ६२ व्या वर्षी लवकर वारले. त्यानंतर, माझ्या आईने सर्व काही सांभाळले. माझ्या आई, वडील आणि भावाने माझ्या मुलाला वाढवण्यात मला खूप मदत केली.''

वर्कफ्रंट
१९८६ मध्ये 'मुसाफिर' या चित्रपटातून उषा नाडकर्णी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्या 'प्रतिघात', 'नरसिंहा', 'लव्ह', 'वास्तव', 'आर...राजकुमार' आणि 'रुस्तम' यासारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. १९९४ मध्ये 'अनहोनी' या हॉरर शोमधून टीव्हीवर पदार्पण करणाऱ्या उषा ताईंना 'पवित्र रिश्ता' मधून खूप लोकप्रियता मिळाली. याशिवाय त्यांनी 'कुमकुम', 'कुछ इस तरह', 'कैसे मुझे तुम मिल गये'मध्येही काम केले. त्यांनी 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सीझनमध्येही सहभाग घेतला होता आणि ७७ व्या दिवशी त्या घराबाहेर पडल्या होत्या.

Web Title: "I live alone, my son does not live with me...", 79-year-old Usha Nadkarni said, expressing her sorrow over living a lonely life...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.