‘साईड रोल’साठी मी म्हातारा नाही

By Admin | Updated: December 2, 2014 02:33 IST2014-12-02T02:15:11+5:302014-12-02T02:33:38+5:30

हॉट आणि सुंदर हिरोईनच्या मागे पळायला मला आवडते. त्यामुळेच माझ्या बहुतांश चित्रपटांचे शूटिंग विदेशात होत असते, असे अभिनेता सैफ अली खान याने सांगितले

I am not old for 'side roll' | ‘साईड रोल’साठी मी म्हातारा नाही

‘साईड रोल’साठी मी म्हातारा नाही

हॉट आणि सुंदर हिरोईनच्या मागे पळायला मला आवडते. त्यामुळेच माझ्या बहुतांश चित्रपटांचे शूटिंग विदेशात होत असते, असे अभिनेता सैफ अली खान याने सांगितले. मी अजून चरित्र अभिनेत्याप्रमाणे ‘साईड रोल’ करण्याएवढा म्हातारा झालेलो नाही, असा दावाही त्याने केला. सैफचे चित्रपट अपयशी ठरत असल्याने तो आता ‘साईड रोल’ करणार असल्याची चर्चा होती; परंतु त्याने स्पष्ट शब्दांत त्याचे खंडन केले आहे. एका मुलाखतीत सैफने अनेक प्रश्नांचा उलगडा केला. पत्नी करिनाचा पडद्यावर हीरो होण्यास आपण तयार असल्याचेही त्याने सांगितले. इम्तियाज अली आणि इतर काही दिग्दर्शकांना मी पटकथा लिहिण्यास सुचविले आहे. पटकथेचे काम पूर्ण होताच प्रोजेक्टला सुरुवात केली जाईल. करिनाचा हीरो म्हणून निश्चितपणे पडद्यावर झळकेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला.

Web Title: I am not old for 'side roll'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.