भारतरत्नसाठी मी अपात्र - अमिताभ बच्चन

By Admin | Updated: January 28, 2015 15:15 IST2015-01-28T15:11:18+5:302015-01-28T15:15:53+5:30

भारत रत्न या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती नाही असे प्रांजळ मत अमिताभ बच्चन यांनी मांडले आहे.

I am ineligible for Bharat Ratna - Amitabh Bachchan | भारतरत्नसाठी मी अपात्र - अमिताभ बच्चन

भारतरत्नसाठी मी अपात्र - अमिताभ बच्चन

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २८ - महानायक अमिताभ बच्चन हे भारत रत्न पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती असल्याचे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले असले तरी आपण या पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती नाही अशी प्रांजळ मत अमिताभ बच्चन यांनी मांडले आहे. 
बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना नुकतेच पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार पुरेसा नसून त्यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांना भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान द्यायला हवा अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र ममता दिदींची मागणी खुद्द अमिताभ बच्चन यांनीच फेटाळून लावली.अमिताभ बच्चन म्हणतात, ममता दिदी, मी या पुरस्कारासाठी पात्र नाही. देशाने माझा आत्तापर्यंत जो सन्मान केला त्याने मी  भारावून गेलो आहे. ममता दिदींनी केलेल्या स्तुतीबद्दल अमिताभ यांनी त्यांचे आभारही मानले आहेत.

Web Title: I am ineligible for Bharat Ratna - Amitabh Bachchan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.