मी 'स्टार वॉर्स'चा फॅन - आमिर खान
By Admin | Updated: December 24, 2015 18:01 IST2015-12-24T18:01:09+5:302015-12-24T18:01:09+5:30
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपण 'स्टार वॉर्स' या चित्रपटाचा मोठा फॅन असल्याचे सांगितले. 'स्टार वॉर्स' हा चित्रपट भारतात २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार

मी 'स्टार वॉर्स'चा फॅन - आमिर खान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपण 'स्टार वॉर्स' या चित्रपटाचा मोठा फॅन असल्याचे सांगितले. 'स्टार वॉर्स' हा चित्रपट भारतात २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार असून मोठ्याप्रमाणात हिट होण्याची शक्यता आहे.
'स्टार वॉर्स' या चित्रपटाचा मी मोठा फॅन आहे. या चित्रपटाविषयी मला खूप उत्सुकता असल्यामुळे हा चित्रपट पाहण्यास मी भरपूर उत्सुक आहे. तसेच, माझ्याकडून 'स्टार वॉर्स'च्या टीमला खूप-खूप शुभेच्छा आहेत, असे अभिनेता आमिर खानने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमिर खान सध्या त्याच्या आगामी 'दंगल' या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.