हृतिकचा महागडा चित्रपट
By Admin | Updated: June 17, 2014 08:02 IST2014-06-17T08:02:59+5:302014-06-17T08:02:59+5:30
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा हृतिक रोशन स्टारर चित्रपट असलेल्या मोहनजोदडो या चित्रपटाने मोठी डील साईन केली आहे.

हृतिकचा महागडा चित्रपट
दिग्दर्शक आशुतोष गोवारीकरचा हृतिक रोशन स्टारर चित्रपट असलेल्या मोहनजोदडो या चित्रपटाने मोठी डील साईन केली आहे. युटीव्हीने या चित्रपटाचे राईटस् १२५ कोटी रुपयांत खरेदी केले असल्याची बातमी आहे. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या चित्रपटात हृतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाने अतिशय चांगला व्यवसाय केला होता. सध्या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनचे काम सुरू आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत शूटिंग सुरू होणार आहे.